Parenting | मुलांच्या संगोपानात करू नका ‘या’ 5 चूका, अन्यथा मोठे झाल्यानंतर प्रत्येक कामात होतील ‘फेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Parenting | नेहमी आई-वडील आपला तणाव किंवा राग मुलांवर काढतात. पालकांच्या मनातील ही गरळ मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करते. एक्सपर्टनुसार, पालकांच्या काही सवयी मुलांचे जीवन कायमसाठी खराब करू शकतात. तर मानसिकदृष्ट्या मजबूत मुले आपल्या समस्या स्वता सोडवण्यात सक्षम असतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात. एक्सपर्टनुसार, मुलांच्या संगोपनात (Parenting) पालकांनी या 5 चूका कधीही करू नयेत.

 

या आहेत 5 चूका, ज्या पालकांनी (Parenting) कधीही करू नयेत (Parents should never make these 5 mistakes) …

 

1. मुलांच्या भावना दाबणे –
मुलांच्या भावना कधीही दाबू नका. मुल कसेही बोलत असले तरी ते स्वताला व्यक्त करत असते, त्याला करू द्या. थेरेपिस्टनुसार, जेव्हा पालक मुलांना म्हणतात की, या गोष्टीवर जास्त रडू नको किंवा ही काही मोठी गोष्ट नाही, तेव्हा ते अशाप्रकारचे हे संदेश देतात की, भावना जास्त महत्वाच्या नाहीत आणि त्या दाबाव्यात.

त्याऐवजी मुलांना विचारा की, त्यांना आता काय वाटत आहे जेणेकरून त्यांना चांगले वाटेल. यामुळे त्यांना भावना स्वता समजणे आणि सावरण्यास मदत मिळेल.

 

2. मुलांना नेहमी अपयशापासून वाचवणे –
मुले आव्हानांना तोंड देत असल्याचे पाहणे पालकांसाठी अवघड काम असते. नेहमी पालक अपयशापासून वाचवण्यासाठी मुलांची मदत करतात, हे चुकीचे आहे. जर मुल अभ्यास चांगला करत नसेल आणि तुम्ही त्याचा होमवर्क करत असाल तर त्याला कधीही आपली कमतरता जाणावणार नाही.

मुलाला जेव्हा शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागेल तेव्हा तुम्ही त्याची मदत करू शकणार नाही. अपयश सुद्धा यशाचा एक भाग आहे आणि हे मुलांना समजू द्या. मुलांमध्ये या भावनेचा विकास करा की, अपयशानंतर सुद्धा यश मिळू शकते.

3. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे –
मुले नेहमी पालकांकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करत असतात आणि आपण प्रत्येक मागणी पूर्ण करणे आपले कर्तव्य समजतो. मात्र, संशोधन सांगते की, मुलाची प्रत्येक मनमानी पूर्ण केल्याने त्यांची मानसिक क्षमता प्रभावित होते आणि ते स्वयंशिस्त शिकू शकत नाहीत.

मुलांना वाटते की, त्यांची जी इच्छा होईल ते मिळेल. मुलांमध्ये छोट्या-छोट्या नियमांद्वारे शिस्तीची सवय टाका. जसे की टीव्ही पाहण्यापूर्वी सर्व होमवर्क पूर्ण करणे, कुठेही जाण्यापूर्वी आपले सर्व सामान एकत्रित ठेवणे.

4. परफेक्शनची अपेक्षा ठेवणे –
प्रत्येक पालकांची इच्छा असते की, त्यांच्या मुलाने प्रत्येक काम परफेक्ट पद्धतीने करावे.
एक्सपर्टनुसार, पालकांच्या या सवयीने मुलांमध्ये आत्म-सन्मान आणि आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते.

मुलांना परफेक्टची व्याख्या समजून सांगा आणि जर ते यामध्ये ते तेवढे यशस्वी होत नसतील
तर त्यांना समजवा की त्यांच्या कोणती कमतरता होती आणि पुढील वेळेस त्याला कशाप्रकार कामगिरी करायची आहे.

 

5. मुलांना नेहमी सहजता जाणवेल याची काळजी घेणे –
अनेक गोष्टी अशा असतात ज्या मुलांना असुविधाजनक वाटू शकतात.
जसे की, नवीन काम करणे, काही नवीन खाणे, नवीन मित्र बनवणे, नवीन खेळ खेळणे किंवा नवीन शाळेत जाणे.

अशावेळी तुम्ही नेहमी मुलांचे सुरक्षा कवच बनण्याची आवश्यकता नाही.
यामुळे त्यांची मानसिक क्षमता कमजोर होते. मुलांना स्वताच नवीन गोष्टी शिकू द्या.
सुरुवातीला त्यांना कठीण वाटेल परंतु हळुहळु ते सहजता जाणवेल.

Web Title :- parenting | parenting tips therapist shares the biggest mistakes kids mental strength

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या मंहमदवाडीमध्ये बिबट्याचे दर्शन ! नागरिकांमध्ये घबराट, वनाधिकार्‍यांनी दिली घटनास्थळी भेट (CCTV व्हिडीओ)

Bhosari Land Case | एकनाथ खडसेंच्या पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण