Parenting Tips | मूल खूप हट्टी झालं असेल तर पालकांनी शिस्त लावण्यासाठी ‘या’ पद्धतींचा अवलंब करा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Parenting Tips | आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्याची प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यांना चांगल्या संगोपनाबरोबरच मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. पण अति लाडामुळे मुलं हट्टी होतात. लॉकडाऊन झाल्यापासून मुलांच्या स्वभावात जिद्दीनं अधिक वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर आपलं मूल अजिबात ऐकत नाही, हे बहुतांश पालकांच्या तोंडून ऐकायला मिळतं (Positive Parenting Tips). मुलांनी हट्टी असणं स्वाभाविक आहे, पण जर तुमचं मूल जास्त आग्रह धरू लागलं तर त्याला वेळीच शिस्त लावणं गरजेचं आहे. अन्यथा, मुलाची जिद्द त्यांच्या भविष्यासाठीही घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुमचं मूलही जास्त जिद्दी असेल आणि कुणाचंही ऐकत नसेल तर त्याला शिस्तीचा धडा काही सोप्या पद्धतीने शिकवा (Parenting Tips).

 

मुलाचं मन समजून घ्या (Understand The Child’s Mind) :
अनेकदा पालकांचं किंवा इतर कुणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आग्रह धरू लागतात. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल. त्यामुळे मुलाच्या स्वभावाकडे पाहून त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करणं सर्वात महत्त्वाचं आहे. ते बोलण्यापूर्वी त्यांना काय आवश्यक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा (Parenting Tips).

 

हट्टी मुलाला शिस्त लावा (Discipline The Stubborn Child) :
मुलाला योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगा. अनेकदा मुलाच्या मुद्द्यावर पालक चिडतात आणि त्याना गप्प करतात, पण त्यांची जिद्द पूर्ण न होण्याचं कारण सांगत नाहीत. यामुळे मूल असमाधानी राहते आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आग्रह धरते. अशावेळी त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक सांगा. त्यांची जिद्द चुकीची का आहे, हे त्यांना प्रेमाने समजावून सांगा. जेणेकरून तो पुन्हा त्या गोष्टीचा आग्रह धरू नये.

 

अनेकदा मुलाच्या चुकीवर पालक रागावतात आणि बोलण्यावरून त्यांना शिव्याही घालतात.
यामुळे मुलाचा स्वभावही रागीट किंवा चिडचिडा (Angry or Irritable) होतो. या स्वभावामुळे आपली मागणी पूर्ण होत नाही तेव्हा तो आग्रह धरतो.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्यावर रागावू नका. मुलाला आधी बोलण्याची संधी द्या. त्यांचा मुद्दा नीट समजून घ्या आणि त्यानुसार शांतपणे त्यांना प्रतिसाद द्या.
त्याला शिव्या देऊन समजावून सांगण्याऐवजी मुलाला प्रेमाने काय समजावून सांगितले जाते ते सहज समजते.

मुलावरील आत्मविश्वास वाढवा (Increase Confidence In Child) :
पालक जेव्हा व्यस्त असतात तेव्हा तो अनेकदा मुलाच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
यामुळे मूलही आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी पालकांसमोर आग्रह धरू लागतं.
त्याला असं वाटतं की, वारंवार बोलून पालक त्याचं म्हणणं ऐकतील नाहीतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला विसरून जातील.
अशावेळी तुम्ही त्यांचं म्हणणं नीट ऐकून घ्या आणि त्यांना गांभीर्याने घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Parenting Tips | know these tips to control naughty child discipline parenting tips news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Facts | डायबिटीज रुग्णाने ठेवू नये ‘या’ 5 ऐकीव गोष्टींवर विश्वास; जाणून घ्या\

 

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 4 गोष्टी, जेलमध्ये जाण्याची येऊ शकते पाळी !

 

Cholesterol Reducing Foods | ‘या’ पद्धतीने खा लसूण, एकाच दिवसात 10% नष्ट होईल नसांमध्ये जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल