Parenting Tips | जिद्दी मुलांना आणखी आडमुठे बनवतील तुमच्या ‘या’ चुका, जाणून घ्या 7 पर्याय आणि मुलांना समजवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Parenting Tips | बहुतांश मुलांना जिद्द करण्याची सवय असते. अशा मुलांना सांभाळणे सोपे काम नसते. जिद्दी मुलांना समजावणे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा अशा मुलांच्या संगोपनावर सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ लागतात. मुलांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेल्यानेच ती आणखी जिद्दी (Parenting Tips) होतात.

भारतीय पालक तसेही खुप कठोर मानले जातात आणि अनेकदा ते आपल्या मुलांना सरळ करण्याच्या नादात अनेक चुका करतात. त्यानंतर परिणाम आणखी उलटा होतो. कशाप्रकारे जिद्दी मुलांना समजूतदार बनवता येऊ शकते ते जाणून (Parenting Tips) घेवूयात.

1. मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका –
जिद्दी मुलाने ऐकावे असे वाटत असेल तर यासाठी अगोदर त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. मजबूत इच्छाशक्ती असलेल्या मुलांचे मत सुद्धा मजबूत असते आणि ती अनेकदा वाद करू लागतात. जर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर ते आणखी जिद्दी होतील. मुलाने जर जिद्दीपणा केला तर शांती आणि धैर्याने त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांचे म्हणणे संपण्यापूर्वीच त्यांना आडवू नका.

2. मुलांसोबत जबरदस्ती करू नका –
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत कोणत्याही गोष्टीवरून जबरदस्ती करता तेव्हा ते स्वाभाने विद्रोही होत जातात. याच सवयी पुढे जाऊन त्यांना जिद्दी बनवतात. मुलांकडून जबरदस्तीने काही करून घेण्याने ते तेच काम करू लागतात ज्यासाठी त्यांना मनाई केली जाते.

मुलांसोबत जबरदस्ती करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या पसंतीमध्ये रस घेतल्यास मुल प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगेल आणि नंतर प्रेमाने त्याला समजवा, काय चुकीचे आहे आणि काय बरोबर.

3. मुलांना पर्याय द्या –
मुलांना ऑर्डर देण्याऐवजी त्यांना सल्ला आणि पर्याय द्या. म्हणजे मुलांना जबरदस्तीने झोपवण्यापेक्षा त्याला विचारा की झोपताना त्याला कोणती गोष्ट ऐकायला आवडेल. तरी सुद्धा मुल ऐकत नसेल तर धैर्य सोडून नका. त्याला म्हणू शकता की, हा तर ऑपशन त्याला दिलाच नव्हता. तुमचे म्हणणे अनेकदा सांगा पण नियंत्रण न सोडता. तुमचे मुल लवकरच जिद्द सोडेल.

4. शांततेत तुमचे म्हणणे समजवा –
मुलावर प्रत्येक गोष्टीसाठी ओरडल्यास तो तसेच उत्तर देण्यास शिकू शकतो. मुलासोबतची चर्चा नेहमी एका निष्कर्षापर्यंत घेऊन जाईल अशी करा, मारहाणीकडे जाईल असे करू नका. तुम्हाला मुलाला समजवायचे आहे, मारायचे नाही.

5. मुलांचा सन्मान करा –
मुलांनी तुमचे ऐकावे असे वाटत असेल तर त्यांच्या म्हणण्याचा सन्मान करावा लागेल.
मुले लादलेल्या गोष्टींना नकार देतात. कोणत्याही गोष्टीत मुलाचे सहकार्य मागा.
मुलांसाठी एक नियम बनवा आणि त्यामध्ये अजिबत शिथिलता देऊ नका.

त्यांच्या भावना आणि विचार ताबडतोब फेटाळू नका. मुले स्वता जे काम करतात ते त्यांना करू द्या.
यातून त्यांना विश्वास वाटेल की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता.

6. त्यांच्यासोबत काम करा –
जिद्दी मुले किंवा आठमुठी मुले खुप जास्त संवेदनशील असतात आणि ते ही गोष्ट सखेाल अनुभवतात की त्यांच्यासोबत कसे वर्तन केले जात आहे.
यासाठी आपला आवाज, बॉडी लँग्वेज, आपल्या शब्दांबाबत विशेष सावधगिरी बाळा.

जेव्हा त्यांना तुमचे वर्तन चांगले वाटत नाही तेव्हा ते प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देऊ लागतात.
आणि पालकांना राग दर्शवतात. तू हे कर, तुला मी हे सांगितले होते, याऐवजी चल असे करूयात, असे करूयात का? असे म्हणा.

7. सौदेबाजी सुद्धा आहे आवश्यक –
अनेकदा आपल्या मुलांसोबत निगोशिएट करणे सुद्धा आवश्यक असते.
जे मुलांना आपल्या मनासारखी गोष्ट मिळत नाही असे समजते तेव्हा ते जिद्द दाखवू लागतात.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करावी. (Parenting Tips)

येथे सावधगिरीने आणि व्यवहारिक प्रकारे यावर तोडगा काढा.
उदाहरणार्थ – जर तुमचे मुल योग्य वेळी झोपायला तयार नसेल तर झोपण्यासाठी दबाव टाकण्याऐवजी थोडी सूट द्या
ज्यामुळे दोघांची मागणी पूर्ण होताना दिसेल.

Web Title :- Parenting Tips | parenting tips stubborn child toddler psychology behaviour indian parents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch | ‘मोक्का’ गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक 

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Facebook ने सांगितले का डाऊन झाला होता सर्व्हर, काही तासातच झाला होता 447 अरब रुपयांचा तोटा