मुलांना इंटरनेटचा वापर करायला शिकवण्यासाठी ‘या’ 5 टिप्स उपयोगी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून अलिकडे ही काळाची गरज बनली आहे. तसेच पालकही मुलांना शांत राहण्यासाठी फोन वापरण्यासाठी परवानगी देतात. तर आज आम्ही तुम्हाला मुलांना कोणत्या गोष्टी पाहण्याचा सल्ला द्यायचा आणि मुलांनी इंटरनेटचा योग्य वापर कसा करायचा याबाबत माहिती सांगणार आहोत.

१. मुलांना वेळ ठरवून द्या
लहान मुलांसाठी एक खास वेळापत्रक तयार करा, यात त्यांच्या खेळण्याचा, अभ्यासाचा, फोन वापरण्याचा वेळ निश्चित करा. जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यास मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होवू शकतो.

२. मुलांशी मैत्री करा.
लहान मुलं खूप खोडकर असतात, ऐकत नाहीत, त्यावेळी मुलांना समजून घ्या, त्यांच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधा. त्यांचा उत्तम मित्र व्हा म्हणजे सर्व गोष्टी मुलं न घाबरता तुमच्यासोबत शेअर करतील.

३. शैक्षणिक अ‍ॅप वापरण्यास सांगा
शाळा बंद झाल्याने अनेक शैक्षणिक अ‍ॅप सुरु झाले आहेत. त्यामधून मुलांना असंख्य गोष्टी शिकायला मिळतात. स्मार्टफोनचा वापर खेळण्यासाठी करण्याबरोबरच मुलं अभ्यास देखील याद्वारे करु शकतील.

४. जास्त वेळ ऑनलाइन गेम्स खेळून देऊ नका
लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळण्यास प्रचंड आवडतं. त्यासाठीच त्यांना सारखं फोन हवा असतो. पण मुलांना जास्त वेळ ऑनलाइन गेम्स खेळू देऊ नका. कारण त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळ शिकवा.

५. मुलांचे आदर्श व्हा
पालक अनेकवेळा फोनमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करण्यास बघतात. म्हणून घरी असताना डिजिटल मीडियापासून थोडं दूर राहा आणि मुलांना वेळ द्या. तसेच मुलांसाठी आदर्श व्हा.