स्कुल बसचालकांच्या संपाने पालक, विद्यार्थ्यांचे हाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

स्कुल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशने आणि आॅल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आज देशभरात एक दिवसांचा संप पुकारला आहे़ आज सकाळी स्कुल बस, व्हॅन न आल्याने हजारो पालकांना मुलांना शाळेत सोडण्याची ड्युटी लागली. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांबाहेर पालकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन एकच वाहतूक कोंडी होताना दिसत होती.

[amazon_link asins=’1405363169′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14c312c7-8bda-11e8-8508-6dd400ebfb76′]

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरु ठेवाव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे पुणे शहरासह अनेक शहरांमधील स्कुल बस, व्हॅनचालकही या संपामध्ये सहभागी झाले. आपल्या वाहनाची मोडतोड होऊ नये, म्हणून काही जणांनी नाईलाजाने आपली वाहने घरीच ठेवले. त्याचा परिणाम मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांवर आली. अचानक मुलांना शाळेत सोडविणे व घरी आणण्याची जबाबदारी येऊन पडल्याने पालकांची आज चांगलीच धांदल उडाली. काहींनी तर चक्क मुलांसाठी सुट्टी घेतली असून काहींना मुलांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांमधील उपस्थितीवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.

काही ठिकाणी स्कुल व्हॅन सुरु असल्याचे दिसून आले. मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने आईवर सोपविण्यात आल्याचे शाळांसमोर झालेल्या गर्दीवरुन दिसून येत होते. असंख्य महिला आपल्या दुचाकीवर मुलांना बसवून शाळेत येत असल्याचे चित्र शहरातील महत्वाच्या शाळांबाहेर दिसत होते. शाळा सुटल्यानंतर त्यांना पुन्हा घेऊन जाण्यासाठी त्यांनाच यावे लागणार असल्याने अनेकींनी आपली आजची सर्व कामे पुढे ढकलली आहेत. काहींनी आॅफिसमधून काही वेळेसाठी सुट्टी घेतली असल्याचे सांगितले.