आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या ‘आई-बापा’विरुध्द पुण्यातील मुलीची हायकोर्टात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कथित निम्न जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने आई वडीलांकडून प्रचंड छळ होत असल्याचा आरोप करत पुण्यातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या आई वडीलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर वडील आणि काकांकडून आम्हा दोघांना धोका आहे. त्यामुळे आम्हाला २४ तास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी तिने याचिकेद्वारे केली आहे.

कोण आहे तरुणी ?
पुण्यातील उंबरे परिसरात ही मुलगी कायद्याचा अभ्यास करते. २९ ऑगस्ट २०१८ रोजी ती १८ वर्षांची झाली. सध्या ती लॉ च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

नेमकं काय घडलं ?
या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध जुळले. तो कथित निम्न जातीचा आहे. परंतु याबाबत तिच्या आईवडीलांना समजल्यावर त्यांनी तिला मुलाला भेटण्यापासून रोखले. तसेच तिचे महाविद्यालयात जाणेही बंद करण्यात आले. तिचे काका वकील आहेत. त्यांना ही बाब समजल्यावर त्यांनी संतापाच्या भरात गावठी कट्टा आणून थेट तिच्या डोक्याला लावत तिला धमकावले. त्यानंतर तिने हे प्रेमसंबंध तोडले नाहीत तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या आई वडीलांनीही तिला प्रचंड मारहाण केली. तसेच संबंधित मुलाला खोट्या अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. असे तिने याचिकेत म्हटले आहे.

त्याच तरुणाशी विवाह करणार
तरुणीला २७ एप्रिल रोजी तिच्या आई वडीलांनी जबरदस्तीने रेल्वेने तामिळनाडूत नेले. त्यानंतर तिने जीवाच्या भीतीने तिने स्वत:ची सुटका करून घेतली. आणि त्यानंतर प्रियकराला फोन केला. तिने त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला असून तो २१ वर्षांचा झाला की त्याच्याशीच लग्न करणार आहे. असे तिने म्हटले आहे.

पालकांना गुन्हेगारी कृत्यापासून रोखावे
तिचा प्रियकर निम्न जातीचा असल्याने त्याला आई वडील आणि काकांचा विरोध आहे. परंतु मी १८ वर्षांची असल्याने सज्ञान आहे. त्यामुळे मला लग्नाचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांचा विरोध असल्याने आमच्या दोघांच्या जीवाला त्यांच्याकडून धोका आहे. त्यामुळे आम्हाला पोलीस सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यापासून रोखावे. अशी विनंती तिने केली आहे.

Pune : Youth drowns in Chakan
BJP candidate injured in road accident in Bengal
BJP bribing people in Amethi, says Priyanka