मराठी रंगभूमीवर परेश रावल यांचा ‘अभिनय’ पहिल्यांदाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारे परेश रावल लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहेत. लवकरच त्यांचं गाजलेलं नाटक महारथी याचं मराठी रुपांतर होणार आहे. अनेकांना वाटत असेल की, परेश रावल यात अभिनय करताना दिसतील. ते या नाटकाची निर्मिती करत आहेत.

या नाटकात अभिनेता सचित पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. सचितने या नाटकाचं पोस्टर इंस्टाग्रामवरून शेअर केलं आहे. सचितने पोस्टर शेअर करूनच चाहत्यांना नाटकाची माहिती दिली आहे. परेश रावल यांच्याबद्दल बोलायचे झाले तर तब्बल एकोणावीस वर्षांनंतर ते रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.

बदाम राजा प्रॉडक्शन निर्मित महारथी हे गाजलेलं नाटक स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भूमिका साकारणाऱ्या सचितला तुम्ही अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये पाहिले आहे. महारथी नाटकाच्या निमित्ताने सचितही 19 वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

नाटका बद्दल थोडं सांगायचं झालं तर सिनेनिर्मात्याकडे एक तरूण नोकरीला लागतो. त्या तरुणाची महत्त्वाकांक्षा आणि निर्मात्याच्या बंगल्यातलं गूढ उलगडणारं हे नाटक असणार आहे. या नाटकाची तालिमही जोरात सुरु आहे. एक तरूण आहे ज्याला सिनेसृष्टीत काम करायचे आहे. यासाठी तो इंदूरहून मुंबईत आला आहे. सचित ही भूमिका साकारत आहे. सचितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या सचित 3 सिनेमात काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त