Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

पोलीसनामा ऑनलाइन : Paresh Rawal | गेल्या अनेक दिवसांपासून ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. 2000 साली हेराफेरी या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटांनी सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडले होते. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाच्या टीझरचे चित्रीकरण मुंबईत झाले आहे. या तिसऱ्या भागाची माहिती स्वतः अभिनेते परेश रावलने (Paresh Rawal) एका मुलाखतीत दिली आहे.

अनेक दिवसांपासून हेरा फेरी 3 या चित्रपटांची चर्चा सुरु होती. या चित्रपटात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन झळकेल अशी चर्चा देखील दिसून आली. मात्र त्यानंतर पुन्हा अक्षय कुमारच राजू ही भूमिका साकारणार यावर शिक्का मोर्तब झाले. या चित्रपटात परेश रावल यांनी बाबुराव आपटे ही भूमिका उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली होती. आता परेश रावल (Paresh Rawal) यांनी या चित्रपटाबाबत त्याचबरोबर चित्रीकरणाबाबत एका मुलाखतीत आपले मत मांडले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “हेराफेरी 3 मध्ये हे त्रिकूट जागतिक स्तरावर हेराफेरी करताना तुम्हाला दिसणार आहे”. यावेळी त्यांना कार्तिक आर्यन देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे का असे विचारले असता ते म्हणाले, “अद्याप याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही”. तर या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई सोबतच दुबई, लॉस एंजेलिससारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी देखील होणार आहे.

काही महिन्यांपासूनच हेरा फेरी 3 या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते.
अखेर या चित्रपटाच्या टीझरचे चित्रीकरण झाले असून सध्या सोशल मीडियावर या संदर्भातील फोटोज वायरल होताना दिसत आहेत.
मुंबईतील फिरोज नाडियाडवालाच्या एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
2000 मध्ये ‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये ‘हेरा फेरी 2’ प्रदर्शित झाला.
तर आता लवकरच हेराफेरी 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :- Paresh Rawal | bollywood actor paresl rawal open up about what is in hera pheri 3

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त