तुम्ही पैसे उसणे घेऊ शकता पण..; परेश रावल यांची राहुल गांधींवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता परेश रावल यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपमे टीका केली आहे. तुम्ही पैसे उसणे घेऊ शकता परंतु हिंमत धैर्य, हिंमत आणि संयम उसणं घेऊ शकत नाही. एका ट्विटला त्यांनी रिट्विट करत राहुल गांधींना टार्गेट केले आहे. राहुल गांधींच्या एका समर्थकाने राहुल गांधीना धीर देणारे एक ट्विट केले आहे. त्यालाच परेश रावल यांनी रिट्विट केले आहे.

काल लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या एका समर्थकाने राहुल गांधीना धीर देणारे एक ट्विट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सन 2005 मध्ये, 54 वर्षांच्या वयात मी माझं सर्व काही गमावलं होतं.

परंतु हार नाही मानली. आज माझं वय 68 वर्षे आहे. सध्या मी यशस्वीरीत्या एक सॉफ्टवेअर कंपनी चालवत आहे. 3 वर्षापूर्वी माझ्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला होता. आज त्याला हृदय प्रत्यारोपणाने तो आनंदी आणि खुशही आहे. त्यामुळे डिअर राहुल गांधी तुम्ही लढा आपण नक्कीच जिंकू.”

याच ट्विटला रिट्विट करत अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना त्यांनी टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये परेश रावल म्हणतात की, “तुम्हील पैसे उसणे घेऊ शकता परंतु हिंमत, धैर्य आणि संयम नाही.”