चायनिज अ‍ॅप TikTok वरून सुरू असलेल्या वादात परेश रावल यांची उडी, ट्विट झालं व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  टिकटॉक स्टरा फैजल सिद्दीकीचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अ‍ॅसिड अटॅकच्या हल्ल्याला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ आहे असे आरोप होत आता टिकटॉक बॅन करण्याचीही मागणी केली जात आहे. तसा हॅशटॅगही सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे. अभिनेते परेश रावल यांनीही यावर भाष्य करत टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

फैजलचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टिकटॉकला धारेवर धरलं आहे. यात आता परेश रावल यांनीही उडली घेतली आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी टिकटॉक बॅन करण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. परेश रावल यांनी ट्विट केलं आहे की, “बॅन टिकटॉक.”

काय आहे फैजल सिद्दीकीच्या टिकटॉक व्हिडओत ?
फैजलच्या एका व्हिडीओत असा एक डायलॉग आहे की, उसने तुझे छोड दिया जिसके लिए तूने मुझे छोडा था. यानंतर तो महिलेच्या तोंडावर एक लिक्विड फेकतो. यानंतर मुलीचा चेहराच एकदम बदलून जातो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खूप व्हायरल झाला. अ‍ॅसिड अटॅकला प्रोत्साहन देणारा हा व्हिडीओ आहे असे आरोप होऊ लागले आहे. याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाकडेही याबद्दल तक्रार करण्यात आली आहे.