प्रियंका गांधींवर हल्लाबोल ? ‘आजीचे नाक कापले’ : परेश रावल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. परेश रावल यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हंटले की, “फुकटच्या बंगल्यात राहून नातीने आजीचे नाक कापले.” दरम्यान, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना दिल्लीच्या लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला सोडण्याची नोटीस दिली आहे. परेश रावल यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, दरम्यान, आपले शब्द मांडताना परेश हे विसरले कि, हा बंगला प्रियंकाला फुकट मिळाला नव्हता.

देत होत्या इतके भाडे

प्रियंका गांधी वाड्रा या बंगल्याचे भाडे देत होत्या. माहितीनुसार प्रियंका गांधी या बंगल्यासाठी दरमहा 37 हजार रुपये भाडे देत होत्या. जवळपास दोन दशकांपासून प्रियंका या घरात राहत आहे. हा बंगला एसपीजी संरक्षणाखाली गांधी कुटुंबाला देण्यात आला होता, परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षा काढून टाकली.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार 21 फेब्रुवारी 1997 रोजी प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी रोडवर सरकारी बंगला देण्यात आला होता. प्रियंका गांधी कुटुंबासमवेत 6-बी हाऊस नंबर 35 लोधी इस्टेटमध्ये राहतात. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबाला एसपीजी संरक्षण देण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like