… म्हणून ‘त्या’ रात्री झोप लागली नाही, PM मोदींनी सांगितलं गुपिताचं ‘रहस्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना त्यांचा ताण दूर करण्याबाबत ‘गुरूमंत्र’ दिला. मोदींनी विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान २’ मोहिमेचं उदाहरण देत विद्यार्थ्यांसोबत एक ‘सीक्रेट’ शेअर केलं. ते म्हणाले ‘चांद्रयान २’ च्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांच्या हताश चेहऱ्यांना पाहून मी रात्रभर झोपू शकलो नव्हतो, असं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.

या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. राजस्थानमधील स्वामी विवेकानंद गव्हर्नमेंट मॉडल स्कूलमधील यशश्री नावाच्या एका दहावीच्या मुलीनं मोदींना प्रश्न केला की १० वीच्या बोर्ड परीक्षेबाबत नुसता विचार जरी केला तरी मूड ऑफ होतो. यापासून मी बाहेर कसे पडू याबाबत टिप्स द्या. त्यावेळी मोदींनी उत्तर दिलं की युवा वर्गाचा मूड ऑफ व्हायलाच नको असं मला वाटतं.

मोदींनी सांगितलं सिक्रेट, त्या रात्री झोप लागली नाही !

मोदींनी विद्यार्थ्यांशी बोलताना विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान २’ बद्दल उदाहरण दिलं. मोदी म्हणाले, चांद्रयान अवकाशात पाठविण्यासाठी कुणाचंही प्रत्यक्ष योगदान जरी नसलं तरी सगळे जागे होते आणि प्रक्षेपण पूर्ण देश मन लावून पहात होता. आणि चांद्रयान २ चा संपर्क विक्रम लँडरशी तुटला त्यावेळी संपूर्ण देश हा निराश झाला होता. आणि त्यावेळी मी देखील तिथेच हजर होतो. अपयशामुळे असं कधी कधी होत असतं’ असं मोदींनी स्पष्ट केलं.

पुढे जाऊन ते म्हणाले की ‘तुम्हाला एक सिक्रेट सांगतो आणि ते म्हणजे काही जणांनी मला तिथे जाण्यास सक्त मनाई केली होती, कारण तुम्ही गेलात आणि चांद्रयान २ जर अपयशी झाले तर काय करणार? तेव्हा मी जायलाच हवं असं उत्तर मी त्या सर्वांना दिलं होतं. चांद्रयान २ चा विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि वैज्ञानिकांचे चेहरे हताश दिसू लागले तेव्हा मला समजले होते की, काहीतरी अघटित घडत आहे. काही वेळानं मला याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितलं. दरम्यान मी वैज्ञानिकांशी याबाबत चर्चा केली आणि रात्री तीन वाजता हॉटेलवर गेलो. तेव्हा त्या रात्री मी झोपू देखील शकलो नाही. नुसताच फेऱ्या मारत राहिलो असे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले.

नंतर मोदी म्हणाले की, अपयश आल्यानं आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळत असतं. एखाद्या वेळी जर अपयश आले तर समजायचे की ही खऱ्या अर्थाने यशाची वाटचाल आहे. एकदा जर आपण थांबलो तर त्यातून बाहेर पडणं हे खूप कठीण असतं त्यामुळे सतत यशाच्या वाटचालीनं प्रयत्न करत रहा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.

फेसबुक पेज लाईक करा –