Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्राने सांगितले तिच्या अपयशामागील कारण; म्हणाली “स्वप्नातही वाटले नव्हते… “

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करत आहे. तिने तिच्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला खरा मात्र आपली चुलत बहीण प्रियांका प्रमाणे तिला चाहत्यांची मने जिंकता आली नाहीत. अजूनही चित्रपटसृष्टीत टिकण्यासाठी प्रणितीचा (Parineeti Chopra) संघर्ष चालूच आहे. बऱ्याच वर्षांपासून परिणीतीला एकही हिट चित्रपट मिळाला नाही. नुकतीच ती ‘उंचाई’ या चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत दिसली होती. यावेळी परिणीतीने आपल्या करिअर विषयी काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

 

 

मागच्या काही काळापासून परिणीतीचे सलग एका मागोमाग एक असे चार चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. मात्र उंचाई या चित्रपटातला प्रेक्षकांचा तसा चांगला प्रतिसाद मिळाला. परिणीती ही एक चांगली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अलीकडे झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या भविष्यात आलेल्या पराभवाबद्दल बोलले आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली, “मी स्वतः पराभव पाहिले आहे आणि या पराभवातूनच मी आता उभी आहे. माझ्या यशामागील संघर्ष आणि मेहनत यांनी आज मला इथपर्यंत पोहोचवले आहे. तुम्ही मेहनत केली कि त्याचे फळ तुम्हाला मिळते. यावर आता माझा विश्वास आहे दहा वर्षांपूर्वी मी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली तेव्हा आदित्य चोप्रांनी मला एक गोष्ट सांगितली होती की कलाकारांची आणि दिग्दर्शकांची नावे लिहून यादी कर ज्यांच्या सोबत तुला भविष्यात काम करायचे आहे. त्या यादीत मी सुरज सरांचे नाव लिहिले होते आणि उंचाई या चित्रपटातून त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

 

पुढे ती म्हणाली, “या चित्रपटात काम करताना मला खूप आनंद झाला.
मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी त्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम करू शकते परिणीतीने (Parineeti Chopra)
इश्कजादे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते तर या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
मात्र यानंतर तिने चाहत्यांवर खास जादू केल्याचे काही दिसले नाही.
आता येणाऱ्या काळात परिणीती पुन्हा कोणत्या सिनेमात दिसेल आणि त्या सिनेमाला चाहते कसा प्रतिसाद देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- Parineeti Chopra | parineeti chopra talks about struggle acting career success and dream project

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा