
Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | परिणीती आणि राघव यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या मान्यवरांना पाळाव्या लागणार अटी; मोबाईल फोन ठेवावा लागणार घरी
पोलीसनामा ऑनलाइन – Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या सेलिब्रिटी लग्नाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरु असून चाहत्यांना देखील परिणीतीच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. याच वर्षी मे महिन्यामध्य़े परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा पार पडला होता. या त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्यांचा विवाह देखील शाही पद्धतीने पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याने अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या लग्नामध्ये काही नियम अटी घालून देण्यात आल्या आहेत. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला या अटींचे पालन करावे लागणार आहे. (Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding)
मागील अनेक महिन्यांपासून परिणीती व राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. येत्या 24 सप्टेंबर रोजी हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात देखील झाली आहे. उदयपूरच्या लीला आणि द ताज लेक पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. यावेळी राजकारणातील आणि बॉलीवुडमधील देखील अनेक सिलेब्रिटी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षिततेसाठी आणि फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये म्हणून परिणीती आणि राघव यांच्या लग्नस्थळी आलेल्या पाहुण्यांना देखील फोन घेऊन येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आधी त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल झाल्यामुळे लग्नाच्या वेळी ही खबरदारी घेण्यात येणार आहे. (Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding)
परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या लग्नाला जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांना मोबाईल फोनची
परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी फोन घरी किंवा जिथे राहण्याची व्यवस्था केली असेल तिथे ठेवून सोहळा
अटेंड करण्यासाठी यावे. असे सांगण्यात आले आहे. मोबाईलमधून वेडिंग फोटो काढणे, शुट करणे याकडे करडी नजर
ठेवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकारची माहिती व फोटो
सोशल मीडियातून व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
यापूर्वी अभिनेता विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लग्नावेळी देखील अशाच पद्धतीच्या अनेक अटी
उपस्थितांना घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता अभिनेत्री परिणीती चोप्रा व खासदार राघव चढ्ढा यांच्या
लग्नावेळी देखील नियम घालण्यात आले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट