‘हा’ चित्रपट नाकारल्याने परिणीती चोप्राला होतोय पश्‍चाताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राचे म्हणणे आहे की, तिला डायरेक्टर सुजीत सरकार यांचा चित्रपट ‘पीकू’ ची ऑफर आली होती. जर तिने त्यावेळी होकार दिला असता तर दीपिका ऐवजी परिणीती ‘पीकू’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असती. आज तिला या चित्रपटाला नकार दिल्याचा पश्चाताप होत आहे. याचा खुलासा परिणीतीने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये केला. या शोमध्ये ती सानिया मिर्जासोबत गेली होती.

परिणीती म्हणाली की, ‘मी खूप गोंधळून गेले होते त्यामुळे हा चित्रपट नाकारला होता. कारण त्यावेळी मी अजून एक चित्रपटात काम करणार होते. नंतर तो चित्रपट बनला नाही. त्यामुळे नुकसान माझेच झाले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पीकू’ मध्ये दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, इरफान खान, मौसमी चटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘

View this post on Instagram

Hi.

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

डायरेक्टर प्रशांत सिंह यांचा चित्रपट ‘जबरिया जोडी’ मध्ये परिणीती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

साइना नेहवालच्या बायोपिकसाठी ट्रेनिंग शुरू

परिणीती बैडमिंटन प्लेअर साइना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अमोल गुप्तेच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटसाठी परिणीतीने ट्रेनिंग सुरु केली आहे.परिणीतीने याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. फोटो शेअर करुन तिने लिहले की, ‘आधी आणि नंतर, सायना नेहवाल आपण हे कसे करता ? ”

या फोटोत ती बैडमिंटन खेळताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती दमून तशीच जमिनीवर झोपलेली दिसत आहे. चित्रपटाची शुटिंग ऑक्टोंबरमध्ये सुरु होणार आहे. पहिले या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका श्रद्धा कपूर करणार होती मात्र, नंतर परिणीतीला कास्ट करण्यात आले.

आरोग्याविषयक वृत्त

ही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

मानसिक रोग होणार कि नाही हे कळणार आता “आवाजावरून “

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

या आजारामुळे २४ वर्षांच्या तरूणावर आतापर्यंत झाल्या ५५ शस्त्रक्रिया

ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी

सिने जगत

अभिनेत्री मलायका अरोराने दिला ‘केस’ बांधण्याबाबतचा ‘उपदेश’, युजर्स म्हणाले…

अभिनेता अर्जुन कपूर हा चांगला ‘किसर’ – अभिनेत्री परिणीती चोप्रा