व्हायरल होतेय ‘बाथटब’मध्ये बसलेल्या परिणीती चोप्राचा फोटो, पाहून व्हाल ‘थक्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये खूपच बिझी आहे. परिणीती आपल्या पुढील चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘द गर्ल ऑन दि ट्रेन’ या चित्रपटाचा हिंदी रीमेक असणार आहे. या चित्रपटाबाबतचा परिणितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

कसा आहे नेमका वायरल झालेला लुक –
या फोटोमध्ये परिणीती एका बाथटबमध्ये बसलेली आहे मात्र तिच्या कपाळावर झालेली जखम खूपच भयानक आहे. फोटो पाहणारे जरासे विचलित होऊ शकतात इतका भयानक जखमेचा हा फोटो आहे. या शूटींबाबत परिणीती म्हणते की मला असे वाटत आहे की जणू काही मी एखाद्या डिसिप्लिन असलेल्या हॉस्टेलमध्ये आहे. एरवी मी शूटिंग संपल्यावर माझ्या कामासाठी जाते मात्र याचे शूटिंग झाल्यावर मी कधी दुसरी दिवशी शूटिंगला जाईल असे मला वाटते.

हॉलिवूडमध्ये या सिनेमात एमिली ब्लंट या अभिनेत्रीने काम केले होते आणि तिने शूटिंग दरम्यान खूप दारू पिली होती आपण मात्र असे काही करणार नसल्याचे परिणितीने सांगितले आहे आणि शूटिंगदरम्यान फक्त पाणी पिणार असल्याचे सांगितले आहे. परिणीती या व्यतिरिक्त सायना नेहवालच्या जीवनपटावर येत असलेल्या बायोपिकमध्येही काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like