Video : साइना नेहवालच्या बायोपिकमध्ये ‘विना मेकअप’ लुकमध्ये दिसणार परिणीति चोप्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीति चोप्रा सध्या आपल्या करिअरच्या पहिल्या बायोपिकची तयारी करत आहे. ती लवकरच बॅडमिंटन चॅम्पियन साइना नेहवाल यांच्या बायोपिकमध्ये साइनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये परिणीति जास्तीत जास्त साइनासारखे दिसण्याचा प्रयत्न करत आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की, परिणीती यासाठी प्रोस्थेटिक किंवा मेकअपचा वापर करणार नाही. याउलट ती साध्या लुकमध्ये दिसून येणार आहे.

परिणीती म्हणाली की, ‘मला १०० % माहित आहे की, मी यामध्ये साइनासारखी दिसेल त्यामुळे तुम्ही मला विना मेकअपचे पाहणार आहे जर गरज लागली तर माझ्या नाकावर प्रोस्थेटिकचा वापर केला जाईल. यासाठी माझ्यासोबत चर्चा केली आहे. ‘

बॅडमिंटन ट्रेनिंगबद्दल परिणीतीने सांगितले की, ‘मी बॅडमिंटन खेळत होते तेव्हा मला वाटत होते की, मला हा गेम खेळता येतो. जास्तीत जास्त मी दोन-तीन दिवसात हा खेळ शिकेल नंतर माहित पडले की, मला दुनियातील सगळ्यात बेस्ट बॅडमिंटन प्लेअरसारखे खेळायचे आहे आणि मला रॅकेटही निट पकडता येत नाही. आता यापासूनच सुरुवात करावी लागणार. चॅम्पियनसारखे खेळणे सोपे नाही.’

मला माहित आहे की, माझ्या पुर्ण बॉडीला साइनासारखे ट्रांसफॉर्म करावे लागणार. मला लंडनमध्ये ५ महिने ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. मी माझ्या ट्रेनर ईशानला तिथे घेऊन जाणार आहे जो प्रोफेशनल बॅडमिंटन आहे. लंडनमध्ये आमची खूपच मजेदार ट्रेनिंग होणार आहे. आम्ही याला ऑक्टोबरपर्यंत पुर्ण करणार आहे. यामध्ये मी माझ्याकडून पुर्ण प्रयत्न करणार आहे म्हणजे मी साइनासारखी दिसेल. लुकनेही आणि बॉडीनेही.

मेकअपकडे जास्त फोकस न करता परिणीतिने आपल्या फिजिकल ट्रांसफॉर्मेशनवर जास्त काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया ती काय काय करणार आहे.

पहिले तर ती आपल्या बॉडीला साइनासारखे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतर लंडनमध्ये पाच महिने बॅडमिंटनची ट्रेनिंग घेणार आहे. यासोबतच बॅडमिंटन ट्रेनिंगसोबत बॉडी कंडीशनिंगवर काम करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसोबत परिणीति आपल्या आगामी चित्रपटाची देखील तयारी करेल. जो हॉलीवुड चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चा रिमेक आहे. चर्चा होते की, या चित्रपटाच्या तयारीसाठी ती लंडनमध्ये जास्त वेळ घालवणार आहे.

याआधी या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर काम करणार होती. तिने अनेक महिने याची ट्रेनिंगही घेतली होती. मेकर्सने चित्रपटासाठी तिचा लुक शेअर केला होता. तिने काही सीनची शूटिंग केली होती. पुन्हा नंतर तिने या चित्रपटाला सोडण्याचा निर्णय घेतला.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या