वाहतूक नियमांचा दंड वाचवण्यासाठी ‘ऑनलाइन’ पध्दतीनं काढा ‘DL’, जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर आता वाहन परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर आकारण्यात येणारा दंड हा अत्यंत अधिक आहे. परंतू आता वाहन परवाना काढणे सहज शक्य झाले आहे.

ऑनलाइन प्रणालीमुळे आता आरटीओच्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. आज ऑनलाइन, ऑफलाइन असे एकूण 5000 पेक्षा अधिक वाहन परवाने दरमहिन्याला देण्यात येतात.

आरटीओ अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले की, परिवहन विभागच्या वेबसाइटवर https://parivahan.gov.in असलेल्या सुविधेमुळे आता वाहन परवाना काढणे अधिक सोपे झाले आहे. यावरुन तुम्ही फॉर्म भरु शकतात तसेच पेमेंट देखील भरु शकतात. वाहन परवाना तयार करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे घरबसल्या तुम्ही वाहन परवाना काढण्यासाठी फॉर्म भरु शकतात.

आता वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाइन टेस्ट घेण्यात येते, त्यातूनच ठरते की तुम्ही वाहन परवानासाठी पात्र आहेत की नाही. त्यामुळे वाहन चालकांला वाहतूकीचे नियमाची माहिती असणे आवश्यक असते.

यासाठी 300 ते 1000 रुपयांपर्यंत शुल्क आणि रिनिवलसाठी लागतात. तसेच कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन 100 रुपये देऊन फॉर्म भरु शकतात. ऑनलाइन प्रक्रियेने सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

ऑनलाइन वाहन परवान्यासाठी प्रक्रिया –

वेबसाइटवर राज्यांची यादी देण्यात येते, सर्वात आधी राज्याची निवड करावी लागते. त्यानंतर लर्नरचा पर्याय असतो, त्यात तुम्ही पूर्ण फॉर्म भरु शकतात. त्यानंतर एक नंबर जनरेट होईल, जो तुम्ही सेव करुन घ्या. तसेच तुम्हाला वयाचे प्रमाणपत्र, आयडी प्रूफ अ‍ॅटेच करावे लागेल. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. त्यानंतर ड्रायविंग टेस्टसाठीचा स्लॉट बूक करावा लागेल.

स्लॉटची निवड केल्यानंतर शुल्क भरावे लागेल. यात लर्निंगसाठी आणि पर्मनंटसाठी वेगळे शुल्क असेल. यासंबंधित माहिती वेबसाइटवर आहे. यावरुन तुम्ही वाहन परवाना रिन्यूव देखील करु शकतात. वाहन परवान्यासाठी टेस्ट पास होणे आता आवश्यक आहे. रोज 240 लर्गिंन वाहन परवाने तयार करण्यात येतात.

आरोग्यनामा ऑनलाइन –