लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर तसेच साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांच्या परिवर्तन ग्राम विकास पॅनेलने सतरा पैकी तेरा जागी विजय मिळवून लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळविले तर प्रतिस्पर्धी अष्टविनायक पॅनेलला चार जागी यश मिळाले.

पूर्व हवेलीतील बहुचर्चित असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणूकी दरम्यान दोन गटात हाणामारी झाली त्यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवल्यानंतरही मतदानाच्या वेळी कुरबूर झाली त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांची सत्ता होती त्यांनी अष्टविनायक पॅनेलच्या माध्यमातून आपले सतरा उमेदवार रिंगणात उतरले होते तर यशवंतचे माजी उपाध्यक्ष माधवराव काळभोर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर तसेच साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शिवदास काळभोर यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सत्तेत परिवर्तन आणण्याचा चंग बांधला होता शेवटी परिवर्तन पॅनेलने सतरा पैकी तेरा जागी विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे