लोकसभेत HM अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भिडले भाजप आणि काँग्रेसचे खासदार, ‘सोनिया-राहुल’ पहातच राहिले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या दोन्ही सदनात सोमवारी दिल्ली हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकसभेत भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. काँग्रेसचे खासदार ‘गृहमंत्री, राजीनामा द्या’ असे फलक दाखवत होते. भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांच्यासह काही भाजप खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

गोंधळामुळे लोकसभा अध्यक्षांनी ओम बिरला यांनी संसदेचे कामकाज थांबवले. असे असताना देखील खासदारांमध्ये वाद सुरुच होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधीसह अन्य खासदार देखील संपूर्ण घटना पाहत होते. तर केरळचे काँग्रेसचे खासदार राम्या हरिदास यांनी गंभीर आरोप लावला. महिला खासदाराने सांगितले की जसकौर मीणा यांनी त्यांना मारहाण केली, जसकौर मीणा भाजपच्या खासदार आहेत.

खासदार राम्या हरिदास यांनी यासंबंधित लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले की 2 मार्चला लोकसभेत जसकौर मीणा यांनी मला मारहाण केली. हे माझ्याबरोबर या कारणाने झाले कारण मी दलित आहे आणि महिला आहे. मी मागणी करते की जसकौर मीणा यांच्याविरोधात कारवाई केली जावी.

प्रल्हाद जोशींचा काँग्रेसवर हल्लाबोल –
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीला उत्तर देताना प्रल्हाद जोशी म्हणाले की ज्यांच्या कार्यकाळात 1984 सारखी घटना घडली ते आज येथे गोंधळ घालत आहेत. मी यांची निंदा करतो.

काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आजाद राज्यसभेत म्हणाले, आम्ही दिल्ली हिंसेवर संसदेत चर्चा होऊ इच्छितो. यावेळी यापेक्षा मोठा मुद्दा दुसरा कोणताही नाही. केंद्र सरकार दिल्लीत शांती आणू इच्छित नाही. पोलीस दर्शक बनून पाहत आहेत.

ओम बिरला म्हणाले –
विरोधकांच्या गोंधळावर अध्यक्ष ओम बिरला म्हणाले, दिल्लीत स्थिती सामान्य झाल्यावर चर्चा होईल. दिल्लीची स्थिती सामान्य करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. हे लोकशाहीचे मंदिर आहे, आम्हाला शांतता हवी आहे. तुम्हाला संसदेबाहेर घोषणाबाजी करण्याचा अधिकार आहे.

संसदेत परिसरात देखील घोषणाबाजी –
विरोधी पक्षांनी संसदेच्या परिसरात आंदोलन करत राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांनी गांधी प्रतिमेसमोर अमित शाहा राजीनामा द्या अशी मागणी केली. काँग्रेससह आम आदमी पार्टी, टीएमसीचे खासदार देखील आंदोलनात सहभागी झाले होते.