नारी शक्तीला सलाम ! संसदेच्या ‘या’ समितीत सर्व महिला खासदार, एकही पुरुष ‘MP’ सदस्य नाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होती, यंदा सर्वात जास्त महिला खासदार लोकसभा सदनात गेल्या आणि नवा इतिहास रचला गेला. महिला सशक्तिकरणासंबंधित संसदीय समितीमध्ये यंदा सर्व माहिला खासदार सदस्य आहेत, हे संसदीय इतिहासात पहिल्यांदीच झाले आहे.
lok-sabha_101719021057.jpg

संसदेत विविध मुद्यांवर समित्या तयार करण्यात येत असतात, ज्यात सर्व पक्षाचे खासदार सहभागी असतात. यंदा महिला सशक्तीकरण आणि त्यासंबंधित समितीत सर्व माहिला आहेत. यात एकूण 30 सदस्य आहेत. त्यामध्ये एकही पुरुष नाही.

या समितीचे नेतृत्व भाजपच्या तरुण खासदार हिना गावित करत आहेत, त्या महाराष्ट्राच्या नंदुरबार मतदार संघातून निवडूण गेल्या आहेत. या समितीत 30 सदस्य आहेत ज्यात 20 लोकसभेतून आहेत, तर 10 राज्यसभेच्या खासदार आहेत.

कोण आहेत या समितीत सहभागी –
हिना गावित या तरुण असल्याने त्यांच्याकडे या समितीचे नेतृत्व देण्यात आले आहे, तर या समितीचे अनेक वरिष्ठ खासदार सदस्य आहेत. भाजपकडून लॉकेट चटर्जी, शोभा करंदलजे यांच्याशिवाय कनिमोझी इत्यादी लोकसभेतून, तर जया बच्चन, मीसा भारती यांच्यासह 10 खासदार राज्यसभेतून असे एकूण सदस्य आहेत.

मागील दोन दशकांपासून काम करत आहे समिती –
संसदेत महिला सशक्तिकरणाशी संबंधित ही समिती 1997 पासून कार्यरत आहे. याआधी 2014 म्हणजे 16 व्या लोकसभेच्या समितीत यात एकूण 28 महिला तर दोन पुरुष खासदार होते. लोकसभा निवडणूकीत एकूण 78 महिला खासदार झाल्या होत्या, जो भारतातील सर्वात मोठा इतिहास आहे. राज्यसभेत आणि लोकसभेत मिळून एकूण 104 महिला खासदार आहेत, त्यात 78 लोकसभातून आणि 26 राज्यसभेतून आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like