Farm Bills 2020 : राज्यसभेत गोंधळ घातल्याने काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह 8 विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शेतकरी बिलावरून राज्यसभेत गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. या सदस्यांना एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

भाजपा खासदारांनी विरोधी पक्षाच्या या खासदारांची सभापतींकडे तक्रार केली होती. ज्यानंतर सभापती वैंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच या खासदारांविराधोत कारवाई केली. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव, डोला सेन यांचा समावेश आहे.

रविवारी सभागृहात झालेल्या घटनेवर सभापती वैंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा राज्यसभेसाठी अतिशय वाईट दिवस होता. काही खासदारांनी पेपर फेकले, माईक तोला, रूल बुक फेकले. या घटनेने मी खुप दुखी आहे. नायडू म्हणाले, उपसभापतींना धमकी देण्यात आली. त्यांच्यावर आक्षेपार्ह टिका करण्यात आली.

सभापती पुढे म्हणाले, खासदारांचा हे वागणे खुप दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मी सल्ला देतो की, कृपया थोडे आत्मपरिक्षण करावे.