Parliament Monsoon Session : मध्यरात्रीपर्यंत चालली संसद, लोकसभेत ‘ही’ 4 महत्वाची विधेयक झाली पास

नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत जोरदार गदरोळ झाला, तर लोकसभेचे कामकाज शांततेत मध्यरात्रीपर्यंत चालले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांच्या सहमतीने शून्य काळातील कामकाज सुरू केले. यादरम्यान 88 सदस्यांनी जनहिताचे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. या दरम्यान, मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (दुरूस्ती) विधेयक, 2020 मंजूर झाले, ज्याअंतर्गत कोविड-19 महामारीसाठी खासदारांच्या वेतन, भत्ते यामधून 30 टक्के कपातीची तरतूद आहे. हे विधेयक राज्यसभेत 18 सप्टेंबररोजीच पास झाले होते.

रात्री 12.36 पर्यंत चाललेल्या लोकसभेच्या कामकाजादरम्यान, अर्हताप्राप्त आर्थिक करार द्विपक्षीय नेटिंग बिल, 2020 (द बायलेटरल नेटिंग ऑफ क्वालिफाइड फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट्स बिल, 2020), राष्ट्रीय संरक्षण युनिव्हर्सिटी बिल 2020 आणि द नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी बिल, 2020 सुद्धा पास झाले आहे.

कामकाज सुरू होण्यास एक तास उशीर झाला, परंतु ठरलेल्या वेळेपेक्षा 5.36 तास जास्त कामकाज झाले. स्पीकर ओम बिरला यांनी सभागृहाचे कामकाज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित केले. कोविडमुळे लोकसभेच्या कामकाजासाठी दुपारी 3 ते 7 पर्यंतची वेळ ठरली आहे. सोमवारी 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज होईल.

कोरोनावर उशीरपर्यंत चर्चा
तत्पूर्वी लोकसभेत कोरोनावर पुन्हा एकदा चर्चा झाली, जी उशीरापर्यंत सुरू होती. सभापती म्हणाले, देश चर्चा आणि समन्वयाने कोरोनावर नियंत्रण मिळवेल. कोरोनावर चर्चेला सुरूवात करताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, देशात कोरोनाची स्थिती जगाच्या तुलनेत खुप खराब आहे. आपण व्हायरस रोखू शकलेलो नाही, आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्यातही यश आलेले नाही. जीडीपी 41 वर्षात प्रथमच मायनसमध्ये गेला आहे.

हर्षवर्धन यांनी वॅक्सीनवर दिली माहिती
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, देशात चारपेक्षा जास्त कोरोना वॅक्सीन प्री-क्निकल ट्रायलमध्ये आहेत. भारतात आम्ही सर्व 30 वॅक्सीन कँडिडेट्सच्या टेस्टींगमध्ये पूर्ण मदत केली. यामध्ये तीन फेज 1, फेज 2 आणि फेज 3 च्या अ‍ॅडव्हान्स ट्रायलमध्ये आहेत. चारपेक्षा जास्त वॅक्सीन कँडिडेट्स प्री-क्निकल ट्रायलच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये आहेत.

राज्यसभेत गदारोळ
विरोधकांच्या गदारोळात शेतकरी बिल राज्यसभेत पास झाले. कृषी संबंधित दोन बिल आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. बिलावर चर्चा करताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. खासदारांनी रूल बुक फाडले आणि माईक तोडला. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्राच्या सहा मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, जेव्हा राज्यसभेच्या उपसभापतींनी विभाजन करण्यास सांगितले तेव्हा विरोधी खासदार हिंसक झाले होते.

राज्यसभेत आज ही तीन महत्त्वाची बिले मांडणार

1) आवश्यक वस्तु (दुरूस्ती) विधेयक, 2020

2) भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा संस्था (दुरूस्ती) विधेयक, 2020

3) बँकिंग नियमन (दुरूस्ती) विधेयक, 2020