Monsoon Session : हायस्कुल मध्ये आल्यानंतर ‘हरिवंश’ यांनी घातले होते पहिल्यांदा ‘शूज’, PM मोदींनी संसदेत सांगितला ‘किस्सा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनता दल (युनायटेड)चे खासदार हरिवंश सिंह यांची पुन्हा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांनी हे पद भूषविले आहे. त्यांनी विरोधी पक्षातील उमेदवार आरजेडीचे खासदार मनोज झा यांचा पराभव केला. सभागृहात उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश सिंह यांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी म्हणाले की हरिवंश जमीनिशी जोडलेले आहेत. पत्रकार आणि समाजसेवक क्षेत्रात त्यांनी बर्‍याच जणांसाठी काम केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी हरिवंशशी संबंधित काही किस्से देखील सांगितले.

पीएम मोदी म्हणाले की समाधान म्हणजे आनंद होय. हरिवंश जी यांना आपल्या घराच्या परिस्थितीतून हे व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले. ते कोणत्या परिस्थितीतून पुढं आले त्याविषयी एक घटना त्यांनी पंतप्रधानांनी सांगितली.

पंतप्रधान म्हणाले की हायस्कूलमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम हरिवंशजींना शूज घालायला मिळाला. त्यापूर्वी त्यांच्याकडे शूज नव्हते. गावातल्या एका व्यक्तीला हरिवंशजी साठी एक बूट बनवण्यास सांगितले. हरिवंश अनेकदा बूट बनवताना बघायला जात असत. जेव्हा श्रीमंत लोक बंगला बांधतात तेव्हा ते पुन्हा पुन्हा बघायला जातात. अशाप्रकारे हरिवंश आपला बूट बघायला पोहोचत असत. ते दररोज शूज बनवणाऱ्याला विचारायचे की, किती दिवस लागतील अजून? हरिवंशजी जमिनीशी किती जोडलेले आहेत ते यावरून समजते.

पीएम मोदी म्हणाले की, सभागृहाचे कामकाज चालवण्याचा त्यांचा मार्ग आपण सर्वांनी पाहिला आहे. हरिवंश यांनी निःपक्षपातीपणे कार्यवाही केली आहे. ते एक महान अंपायर होते आणि भविष्यातही राहतील. आपली कर्तव्ये पार पाडण्यात ते नेहमीच मेहनती आहेत.

हरिवंश सिंह यांच्याबद्दल
राज्यसभा खासदार होण्यापूर्वी हरिवंश सिंह यांची ओळख पत्रकार म्हणून झाली. त्यांचा जन्म जयप्रकाश नारायण यांचं गाव असणाऱ्या सीताब दियारा येथे झाला. सुरुवातीपासूनच ते समाजवादी विचारसरणीचे व्यक्ती म्हणून परिचित होते. हरिवंश सिंह वाराणसीतून शिक्षण घेत असतानाच जेपी चळवळीत सामील झाले.

नंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि सुमारे चार दशके पत्रकारितेत सक्रिय राहिले. त्यांनी देशातील बर्‍याच मोठ्या वर्तमानपत्रांसाठी काम केले आणि 1989 मध्ये प्रभात खबर सुरू केली. 2014 मध्ये जेडीयूने त्यांना राज्यसभेवर पाठविले आणि 2018 मध्ये राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली, परंतु यावर्षी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा त्यांनी त्याच पदावर निवड झाली आहे.