राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहणार, काँग्रेसच्या ‘या’ बडया नेत्याचे वक्‍तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने राहुल गांधींवर पुन्हा एकदा विश्वास दाखला आहे. दिल्लीत झालेल्या कोर ग्रुपच्या बैठकीनंतर आता पक्षाचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की राहुल गांधींच काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तेच काँग्रेसचे अध्यक्ष राहणार आहेत.

लोकसभा निवडणूकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते. असे असले तरी पक्षातील नेता त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि मानण्यात येत आहे की त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे.

काँग्रेसची ही बैठक संसदेच्या सत्राच्या आधी घेण्यात आली, बैठकीत ए के एंटनी, जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जून खरगे हे उपस्थित होते. ही बैठक ए के एँटनी याच्या अध्यक्षतेखाली होत आहे. बैठकीत लोकसभेवर काँग्रेसच्या नेत्यांची नियुक्ती आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आली. यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सहभागी नव्हते असे सांगण्यात आले. सोनिया गांधी आणि प्रियंका गांंधी सध्या रायबरेलीच्या दौऱ्यावर आहे. रायबरेली अशी एक जागा आहे जी 2019 मध्ये काँग्रेसने जिंकली होती.

दोन कार्यकारी अध्यक्ष –

राहुल गांधी काँग्रेसचा राजीनामा देण्यावर ठाम असल्याने काँग्रेसने एका पेक्षा आधिक कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात येईल असे मॉडेल मांडले होते. त्यातील एक जर दक्षिण भारतातील असेल तर काँग्रेसला याचा फायदा होईल. तर दुसरा प्रस्ताव असा देखील आहे की कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील असावा. परंतू आता रणदिप सुरजेवाला यांनी राहुल गांधींच काँग्रेसचे अध्यक्ष राहतील हे स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता राहुल गांधी काय निर्णय घेतील हे पाहणे योग्य ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज