काँग्रेसच्या ‘त्या’ 7 खासदारांचे निलंबन मागे, सर्वच पक्षांनी केली होती सभापतींना विनंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या सात खासदारांच्या निलंबन प्रकरणावर बुधवारी संसदेत चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेत या दोन्ही प्रकरणावरुन जोरदार गोंधळ झाला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वदलीय बैठक घेतली. यात निश्चित करण्यात आले की या सर्व खासदारांने निलंबन मागे घेण्यात यावे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सात खासदरांनी म्हणजेच गौरव गोगोई, टी. एन. प्रतापन, वकील डीन कुरियाकोस, बेनी बेहनन, मणिक्कम टागोर, राजमोहन उन्नीथन आणि गुरजीत सिंह औजला यांनी दिल्लीत झालेल्या हिंसेवरुन गोंधळ घातला होता. या काँग्रेस खासदारांवर लोकसभा अध्यक्षांवर पेपर फेकण्याचा आरोप आहे. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या खासदारांना निलंबित केले होते. यामुळे काँग्रेसवर मोठी आपत्ती आली होती.

ओम बिर्ला लोकसभेत परतले आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गैरवर्तनामुळे ते तीन दिवस सदनात आले नव्हते. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी यावर आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, तुम्हाला परत पाहून आनंद झाला. अनेकदा असे काही होते की जे आपल्याला नको असते. आम्हालाही वाटते की संसदेत चांगले कार्य पार पडावे. आम्ही विरोधक म्हणून येत नाही. खासदारांच्या निलंबनावर ते म्हणाले की कदाचित चूक झाली असेल परंतु त्याची चौकशी झाली पाहिजे.

संसदेच्या अर्थसंकल्पाच्या सत्राचा हा आजचा सहावा दिवस आहे. आज राज्यसभा आणि लोकसभा कामकाजाची सुरुवात गोंधळाने झाली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज 1.30 वाजेपर्यंत स्थगित केले. तर राज्यसभेचे कामकाज देखील 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

आज लोकसभेत दिल्ली हिंसेवर उत्तर देणार गृहमंत्री अमित शाह –
दिल्ली हिंसेवर लोकसभेत बुधवारी नियम 193 अंतर्गत चर्चा होणार आहे. गृह मंत्री अमित शाह यावर उत्तर देतील. काँग्रेस बऱ्याच काळापासून यावर चर्चा करु इच्छित आहे आणि संसदेचे कामकाज बाधित होत आहे, परंतु सरकारने सांगितले की या मुद्यावर होळीनंतर चर्चा होईल.