पार्थ अजित पवारांचा चालक ‘बेशुध्द’ अवस्थेत सुपा येथे आढळला, अपहरणाचे ‘गुढ’ गुलदस्त्यातच !

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करण्यात आले. अपहरण झालेल्या मनोज ज्योतीराम सातपुते यांना अपहरणकर्त्यांनी बेशुद्ध अवस्थेत पारनेर तालुक्यातील सुपा येथे सोडून दिले. मनोज सातपुते याचे मुंबईतून अपहण करण्यात आले होते. दरम्यान, पार्थ पवार खोलात जाऊन माहिती घेण्यासाठी पुणे आणि मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. अपहरणकर्त्यांनी तू पार्थ पवारांचा ड्रायव्हर आहेस का ? अशी विचारणा करून कुलाबा येथून सातपुते यांचे अपहरण केले. त्यांना सुपा येथे सोडून दिल्यावर सातपुते हे दुसऱ्या दिवशी शिक्रापूर या त्यांच्या गावी बसने घरी परत आले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यांचे अपहरण नाट्याने मुंबई आणि शिक्रापूर पोलीस चक्रावून गेले आहेत.

चालक मनोज सातपुते याने तक्रारीत म्हटले आहे की, ५ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी आली. त्यांनी तू पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक आहेस का अशी विचारणा करून आम्हाला त्यांना भेटायचे असे सांगून पुढच्या सीटवर बसवले. मात्र, त्यापुढे काय झाले हे आठवत नसल्याचे सातपुते यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, अपहरण करणाऱ्यांनी सातपुते यांना मारहाण केल्याच्या खुणा शरीरावर आहेत. त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुसऱ्या दिवशी सकाळी सुपा येथे सोडल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे.

मनोज सातपुते यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाकल केले आहेत. तसेच गुन्हा कुलाबा पोलिसांकेडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण घटनेची माहिती स्वतः पार्थ पवार पोलिसांकडून घेत असून या प्रकरणाची सत्यता नेमकी काय याबाबत माहिती घेण्यासाठी ते लवकरच कुलाबा पोलिसांची भेट घेणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या