Parth Pawar | गाववाला व बाहेरचा वाद उभा करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवा; पार्थ पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मावळ लोकसभा निवडणूकीत पुन्हा उतरण्याचे संकेत दिले आहे. एका ट्विटमधून पार्थ पवारांनी (Parth Pawar) हे संकेत दिले आहे. जर असं घडलं तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाचे रंग पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे (Shivsena) असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) हे विद्यमान खासदार आहे. अशावेळी शिवसेना काय भूमिका घेणार? की माहाविकास आघाडी सरकारमध्ये या जागेवरुन फूट पडणार? अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

पार्थ पवारांच्या (Parth Pawar) ट्विटमधला मजकूर हा पिंपरी चिंचवडमधील गाववाले आणि बाहेरच्या राजकारणाच्या अनुषंगाने आहे. हे राजकारण थाबवावं असं पार्थ यांनी भाजपला (BJP) उद्देशून म्हटले असले तरी यातून मावळ लोकसभेत पराभवाला कारणीभूत ठरलेल्या बाहेरच्या उमेदवाराचा मुद्दा देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे हे ट्विट म्हणजे ‘एक तीर-दो शिकार’ असंच असल्याची चर्चा आहे.

 

पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावलेत. विकासात कररुपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय. त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करुन सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे. गाववाला व बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही. आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत #pcmc असे म्हटले आहे.

भाजपला टार्गेट करताना पार्थ यांनी मावळ लोकसभेतून (Maval Lok Sabha) पुन्हा नशीब अजमावणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हे संकेत महाविकास आघाडीच्या दृष्टीने अडचणीचे ठरु शकतात.
कारण मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून या मतदार संघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रणकंद माजू शकतं.
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले.
परिणामी बारामतीतून आलेल्या पार्थ पवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
या निवडणुकीत बारामतीचे पार्सल परत पाठवा हे निवडणुकीतील प्रचाराचा कळीचा एक मुद्दा होता. त्यामुळे पार्थ पवारांचे हे ट्वीट म्हणजे ‘एक तीर-दो शिकार’ असाच काहीसा असल्याची चर्चा आहे.

 

Web Title :- Parth Pawar | ajit pawar son parth pawar may be fight again from maval lok sabha hints given through tweets said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Legislative Council By-Election | विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव बिनविरोध

Petrol Diesel Price | सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! लवकरच स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, 7 आठवड्याच्या खालच्या स्तरावर आले कच्च्या तेलाचे दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी