पार्थ पवार यांच्या धावत जाण्याच्या स्टंटला सोशल मीडियाने केले ट्रोल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना सोशल मीडियाने पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पार्थ पवार काल मोहल्ला परिसर पनवेल या ठिकाणी पोहचण्यासाठी धावत सुटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. सभेला वेळेत पोचण्यासाठी ट्रॅफिकमध्ये गाडी फसल्याने पार्थ पवार धावत सभेच्या ठिकाणी गेले असे पार्थ पवार यांच्या सोशल मीडिया टीमने म्हणले होते. मात्र, तरीही सोशल मीडियाने पार्थ पवार यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

पार्थ पवार यांच्या सोशल मीडिया टीमने व्हायरल केलेला व्हिडीओ पनवेल परिसरात वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळे पार्थ पवार सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल होऊ लागले आहेत. सभेची वेळ पाळण्यासाठी पार्थ पवार पळत निघाले आहेत आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना पळत जाण्याची वेळ आली आहे असे त्यांच्या सोशल मीडिया टीमच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, मोहल्ला परिसरात कसली ही सभा नव्हती तसेच कोणतीही वाहतूक कोंडी नव्हती असे म्हणत पार्थ पवार यांना सोशल मीडियाने चांगलेच धारेवर धरले आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी पार्थ पवार स्टंट करत असल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर सोशल मीडियाने ठेवला आहे. दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पार्थ पवार यांनी सीएसएमटी ते पनवेल असा रेल्वे प्रवास केला. पनवेल ते मध्य मुंबई असा रोजचा प्रवास नोकरदार वर्ग करत असतो. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांना करायचा होता. मात्र, सकाळच्या वेळी पनवेलकडून मुंबईच्या दिशेने अधीक लोक प्रवास करतात. मात्र, पार्थ पवार यांनी मुंबईकडून पनवेलकडे उलटा प्रवास केल्याने देखील सोशल मीडियाने त्यांना धारेवर धरले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like