तर पार्थ पवार मावळ मधून लढणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पवार कुटुंबांच्या उमेदवारी वरून सध्या राजकारणात उलट सलट चर्चाना उत आला आहे. अशातच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पार्थ पवार यांनी मावळ मधील उमेदवारीवर महत्वाचे विधान केले आहे. आपणास पक्षाने संधी दिली तर आपण मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढू असे पार्थ पवार म्हणाले आहेत. त्याच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

जर पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या सूचना दिल्या तर मी निवडणूक लढेल असे पार्थ पवार याची म्हणले आहे. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक महानगर मावळ मतदारसंघाचा भाग आहे. या भागात शरद पवार आणि अजित पवार यांनी या भागात चांगलीच पक्ष बांधणी केली आहे. तसेच औद्योगिक विकासात या दोन नेत्यांनी मोलाची भर घातली आहे याचा फायदा पार्थ पवार यांच्या उमेदवारीला होईल असे बोलले जाते आहे.

शरद पवार यांची तिसरी पिढी हि राजकारणात येऊ घातली आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी मिळताच या विधानावर शिक्का मोर्तब होणार आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे काही लोकांकडून स्वागत होत आहे तर काही लोक त्यांच्या उमेदवारी बद्दल राग व्यक्त करत आहेत. हि निव्वळ घराणेशाही असल्याचे देखील लोकांनी म्हणले आहे. तर पक्षाचा कार्यकर्ता उमेदवारीस अपात्र ठरतो तर अजितपुत्र कसे पात्र ठरतात असा सवाल देखील लोकांमधून विचारला जात आहे.