पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेनं, चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका पाहता ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल सत्यमेव जयतेच्या दिशेनं सुरू आहे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

बीडमधील विवेक रहाडे या युवकानं मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केलं आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागं होऊन आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारनं हा गुंता सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबद्दल विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार सत्यमेव जयतेच्या मार्गावर आहेत असं मत व्यक्त केलं. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यामुळं ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like