कार्य़कमांना उशीरा पोहचण्याचा पार्थ पवारांकडून ‘ट्रेंड’ कायम

पार्थ पवार पोचले अजित पवार निघाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणापासून चर्चेत आहेत. त्यातच ते सभेच्या ठिकाणी नेहमी उशीरा येत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. आज पिंपरी येथे आयोजित केलेल्या कामगार संघटनेच्या मेळाव्याला अजित पवार वेळेवर आले. मात्र, पर्थ पवार हे दीड तास उशिरा कार्यक्रमास्थळी आले. पार्थ पवार येताच अजित पवार हे तेथून निघून गेले.

आज पिंपरीमध्ये एका कामगार संघटनेने कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अजित पवार आणि पार्थ पवार येणार होते. अजित पवार ठरलेल्या वेळेत आले. त्यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम संपवून अजित पवार पुढील कार्य़क्रमासाठी जाण्यासाठी निघाले त्यावेळी पार्थ पवार कार्य़क्रमस्थळी आले. परंतु अजित पवार या ठिकाणी न थांबता निघून गेले. त्यामुळे पार्थ पवार यांचा कार्य़क्रमाच्या ठिकाणी उशीरा येण्याचा ‘ट्रेंड’ कायम असल्याचे दिसून आले.

पार्थ पवारांचे कार्य़क्रमांना उशिरा येण्याचे चालूच आहे. ज्या कार्य़क्रमांना वडील आणि आजोबा वेळेवर पोहचतात तिथे मात्र पार्थ उशिरा पोहचतात. मागील काही दिवसांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पिंपरीतल्या कार्यक्रमाला अजित पवार स्वतः वेळेत आले. वेळ न दवडता त्यांनी कामगारांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्थ पवार मात्र तब्बल दीड तास उशिरा पोहोचले. पार्थ तिथे दाखल होईपर्यंत त्यांच्या वडिलांचे भाषण संपले होते. मुलगा मंचावर आला तर वडिलांनी मंच सोडला.

उशिरा पोहोचल्यामुळे आजच्या कार्यक्रमात पार्थ पवारांचे भाषण झालेच नाही. दुसऱ्या बाजूला पार्थ यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील अजित पवार कंबर कसून प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पार्थ पवारांना त्यांच्या उशिरा आल्याबद्दल आणि भाषण न केल्याबद्दल विचारले असता मी बोलणं किंवा दादांनी बोलणं एकच आहे, दादांना जे बोलायचं होतं ते बोलुन गेले, मी कामगारांसाठी काय करणार याच्या सोशल मीडियावर मी पोस्ट टाकल्या आहेत, असं म्हणत पार्थ पवारांनी पुन्हा एकदा वेळ मारून नेहली.