पार्थ यांची नाराजी कायम ? कुटुंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘माझा नातू हा अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत नाही’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारे आणि अयोध्येतील रामंदिराचे समर्थन करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना फटकारले. त्यानंतर पार्थ पवार यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. कारण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्थ कुटूंबातील अन्य सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

काल पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. आता पार्थ कुटूंबातील इतर सदस्यांशी चर्चा करणार आहेत. कुटूंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन ते निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, पवार कुटूंबात कलह वाढल्याच्या चर्चा सुरु होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत पार्थ यांना पवारांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर बोलवून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, काल पार्थ यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवारांची नाराजी ?
शरद पवारांनी पार्थ पवार यांनी फटकारल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. कॅबिनेट बैठकीतून ते लवकर बाहेर पडले होते. त्यानंतर पवार कुटूंबीयांची सिल्व्हर ओक येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे काही नेते सारवा सारवा करत आजोबांनी नातवाला सुनावलं म्हणून काय झाले असे सांगत आहेत. तर एक वडील म्हणून अजित पवारांना शरद पवारांचे पार्थला बोललेलं शब्द लागल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like