Parth Pawar- Y Plus Security | पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत असताना महायुती सरकार पार्थ पवारांवर मेहरबान, वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Parth Pawar- Y Plus Security | सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरु आहे. राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. राजकीय नेत्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारने (Mahayuti Govt) त्यांना थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचे पाहायला मिळत आहे.(Parth Pawar- Y Plus Security)

लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलात मोठ्या मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील ‘प्रतिष्ठित’ व्यक्तींची सुरक्षा काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे पुण्यातील 85 व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. असे असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि
रोहित पवार (Rohit Pawar) यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती.
मात्र, पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सुरक्षा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवारांचं ‘ते’ वाक्य चर्चेत

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेते पदी अजित पवार असताना त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था कशाला पाहिजे असे म्हटले होते.
तसेच एक वाय प्लस व्यवस्था एका व्यक्तीला देण्याचा खर्च 20 लाख रुपये येतो असे म्हणत शिवसेनेच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता.
मात्र, सत्तेत आल्यानंतर स्वत:च्या मुलाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

कशी असते ‘वाय +’ श्रेणी सुरक्षा

राज्यातील मंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना वाय प्लस सुरक्षा देण्यात येते.
हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. वाय प्रकारात १ किंवा २ कमांडो + पोलीस कर्मचाऱ्यांसह ११ जवानांचे सुरक्षा कवच असते.
दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) ऑफर करते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yerawada Pune Police | पुणे : 2 पिस्तूल व 4 जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांकडून अटक (Video)

PMC Biomining Project | मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी बायोमायनिंग प्रकल्प 6 महिन्यांपासून ठप्प ! देवाची उरुळी, फुरसुंगी येथील नागरिकांचा जाच काही संपेना; ‘पॉवरफुल’ नेत्याच्या आशीर्वादाने घनकचरा विभाग सुसाट