लोकसभेत पार्थच्या पराभवाने ‘धक्‍का’ मुळीच नाही : अजित पवार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नेते मोठ्या प्रमाणावर राज्यात दौरे करत असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील आपला पुत्र पार्थ याच्या पराभवावर भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी भाष्य केले आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, पार्थ पवार याच्या पराभवानंतर पवार कुटुंबियांना याचा कोणताही झटका बसला नसून बाकीच्या उमेदवारांच्या पराभवाचे जितके दुःख झाले तितकेच दुःख पार्थच्या पराभवाचे देखील झाले.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवाविषयी जास्त काही न बोलता त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली.

दरम्यान, त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेविषयी बोलताना सांगितले कि, याआधी ‘पिंपरी-चिंचवड बेस्ट सिटी होती त्यानंतर ती स्मार्ट सिटी झाली. मात्र आता भाजपने ती वेस्ट सिटी केली आहे. त्याचबरोबर शहरातील कचरा प्रश्नावरून देखील त्यांनी भाजपवर टीका केली.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या