इंदापूर येथील मोफत सर्वरोगनिदान शिबीरात 463 शिबीरार्थीचा सहभाग

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   सावित्रीबाई फुले यांचे 190 व्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्था इंदापूर यांचे वतीने इंदापूर येथील संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये 3 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात 463 शिबीरार्थींनी सहभागी झाले.सदर शिबीरार्थींची शिबीरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तर विविध आजारावरील औषधे गोळ्यांचे वाटप मोफत करण्यात आल्याची माहीती आयोजक पांडुरंग शिंदे यांनी दीली.

शिबीराचे उदघाटन राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून करण्यात आले.यावेळी अकलुज येथील प्रसिद्ध हदयरोगतज्ञ डाॅ.एम.के.इनामदार, नेत्ररोगतज्ञ डाॅ.महाविर गांधी,अस्थिरोगतज्ञ डाॅ.वैभव गांधी,फॅमीली फिजीशियन डाॅ.दत्ता गार्डे, त्वचारोग तज्ञ डाॅ.कुलकर्णी, आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणाचे कार्य महान आहे.सावित्रीबाई फुले समाज प्रबोधनाला प्राधाण्य देताना म्हणतात..स्त्री जन्मा तुझी कहाणी, हदयी अमृृत नयनी पाणी.अशा भयावह परिस्थीतीत अज्ञानाच्या गडद अंधारात येथील न्यायव्यवस्थेने स्त्रीयांना लोटले असताना त्यांना शिक्षणाचे कवाड उघडुन प्रतिकुल परिस्थीतीशी दोन हात करत ज्ञानाची ज्योत पेटविण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केल्याने आज त्यांची 190 वी जयंती साजरी करताना सावीत्रीबाई फुले यांचे कार्याचा अभिमान वाटत असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

मोफत तपासणी शिबीरासाठी इंदापूर येथील डाॅ.नामदेव गार्डे, डाॅ. अनिल पुंडे, डाॅ.श्रेणीक शहा,डाॅ.संदेश शहा, डाॅ. बाळासाहेब राऊत,डाॅ.शिरिष साळुंखे, डाॅ.मनिषा बाबर, डाॅ.सचिन बाबर, डाॅ. पुनम शिंदे, डाॅ. सागर दोशी, डाॅ.समीर मुलाणी, डाॅ.श्रद्धा काळे, डाॅ.शिवाजीराव खबाले, डाॅ.अरून गार्डे, डाॅ.यतीन शिंदे, डाॅ.प्राची देवकर, डाॅ. अमीत देवकर, डाॅ.मीलिंद खाडे, डाॅ.रूषिकेश गार्डे, डाॅ.अनिल पेठकर, डाॅ.रियाज पठाण आत्यादी तज्ञ डाॅक्टरांनी शिबीरात सहभागी होउन शिबीरार्थींची मोफत तपासणी करून योगदान दीले.

युवराज मस्के,बाळासाहेब व्यवहारे,बाबासाहेब भोंग, बाबा जाधव,गणेश जाधव, अवधुत पवार,दादा बोराटे, आप्पा शिंदे, विशाल फोंडे,गोविंद बोराटे,महेश ढगे, चंद्रकांत शेंडे, आशितोष शिंदे,सचिन शिंदे,मयुर शिंदे, मोहन शिंदे, नितिन पांढरे,बाळासाहेब धोत्रे,अमोल राऊत,नवनाथ शिंदे, शेखर राऊत इत्यादींनी कार्यक्रमात महत्वाचे योगदान दीले. सुत्रसंचलन सुधाकर बोराटे यांनी केले तर आभार मेजर स्वप्निल शिंदे यांनी मानले.