Partner Choice | पैसा-सौंदर्य नव्हे, पुरुषांमध्ये ‘ही’ गुणवत्ता सर्वात महत्वाची मानतात महिला, जाणून घ्या कोणती

नवी दिल्ली : Partner Choice | जोडीदार निवडताना लोक केवळ शारीरीक ठेवण, सौंदर्य आणि पैसाच बघत नाहीत, तर इतरही अनेक आवश्यक बाजू पाहतात. एका नवीन स्टडीत समोर आले आहे की, जेव्हा गोष्ट मजबूत नात्याची येते तेव्हा पार्टनरचे कुटुंब आणि मित्रांसोबत चांगले वर्तन, हे सेक्स आणि पैशापेक्षा महत्वाचे असते. या स्टडीत पार्टनरच्या (Partner Choice) सर्वात महत्वाच्या गुणांबद्दल सांगितले गेले आहे.

या स्टडीत पार्टनच्या वर्तनात ’सेन्स ऑफ ह्यूमर’ आणि ’सेक्शुअल सॅटिसफॅक्शन’ सारख्या क्वालिटीज प्रमुख स्थानी राहिल्या आहेत, परंतु बहुतांश लोकांनी हेच सांगितले की, त्यांचा पार्टनर त्यांचे मित्र किंवा कुटुंबाबाबत कसा रिअ‍ॅक्टर करतो, हे महत्वाचे आहे.

Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

युनिव्हर्सिटी ऑफ निकोसिया (सायप्रस) च्या या आकड्यांवर ब्रिटनच्या टॉप रिलेशनशिप चॅरिटी ’रिलेट’ च्या प्रमुख अमांडा मेजर यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. रविवारी यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, एकमेकांच्या मित्रांना पसंत करणे आणि त्यांच्यासोबत सहजता जाणवणे, नात्याला आणखी मजबूत बनवते आणि आपलेपणाची भावना वाढते.

स्टडीत काय सांगितले तज्ज्ञांनी…

– कोणत्याही लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये संकटे येत असतात पण आपल्याजवळ एक सपोर्टिव्ह कुटुंब असेल तर कपल्सला अडचणीच्या काळातही मदत मिळते. फक्त त्यांनी त्यांचे निर्णय जबरदस्तीने लादू नयेत.

– सोशल सायंटिस्ट मेनेलोस एपोस्टोलू आणि क्रिस्टोफोरोस क्रिस्टोफोरो यांच्या नेतृत्वात निकोसियाच्या या स्टडीत 207 लोकांकडून त्यांचा भूतकाळ आणि वर्तमान काळाबाबत प्रतिक्रियांचे विश्लेषण केले गेले.

– स्टडीत आढळले की, महिलांपेक्षा पुरूषांनी हे मान्य केले की, एका यशस्वी रिलेशनशिपसाठी
सेक्शुअल सॅटिसफॅक्शन आणि तडजोड करण्याची पात्रता जास्त महत्वाची असते.

– तर महिलांनी या गोष्टीला प्राथमिकता दिला की पार्टनर प्रतिबद्ध (कमिटेड) असावा.

– आई-वडिल मुलांची पर्सनल लाईफ आणि त्यांच्या जोडीदाराबाबत खुप रस दाखवतात. जर
पालकांनी जोडीदाराला पसंत केले तर ते तुमच्या नात्यात हस्तक्षेप करू लागतात. इतके की ते कधी-कधी रणनिती वापरतात.

– आपल्या पार्टनरच्या कुटुंबासोबत राहण्याने नाते तुटण्याची शक्यता सुद्धा कमी होते.

– पार्टनरचे कुटुंबाशी नाते मजबूत असेल तर कपल्सचे बाँडिंग आपोआप मजबूत होते.

– अशाच प्रकारे, पार्टनरच्या मित्रांसोबत तुमचे चांगले बाँडिंग होऊ शकले नाही तर नाते कमजोर होऊ शकते.

– कारण अनेक लोकांना मित्रांकडून भावनिक आधार मिळतो आणि त्यांना वेगळे व्हायचे नसते.

हे देखील वाचा
Gold-Silver Price Today | 2 आठवड्यात 2000 रुपयांनी सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा दर

Prepaid Smart Meter | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Partner Choice | loving your in laws can make your love strong with partner without physical relation or money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update