अखेर ‘बेपत्ता’ एएन ३२ विमानाचे अवशेष मिळाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममधून जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेल्या हवाई दलाच्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचे अवशेष तब्बल ९ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिळाले आहेत. उड्डाण केलेल्या ठिकाणापासून १५ ते २० किमी अंतरावर हे अवशेष सापडले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी ३ जून रोजी या विमानाने जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलं होतं. आणि त्यानंतर २५ ते ३० मिनिटांनी त्याचा जमिनीशी संपर्क तुटला होता. त्यानंतर अजूनपर्यंत कोणताही संपर्क झाला नव्हता. त्या विमानात १३ प्रवासी हि होते.

दरम्यान विमान बेपत्ता झाल्यावर विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर आणि विमानं तैनात करण्यात आली होती. एवढेच नाही तर विमान शोधून देणाऱ्याला भारतीय हवाई दलाकडून ५ लाखाचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. हे विमान शोधण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. त्यामुळे तब्बल ९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे विमान सापडेले आहे.

यावेळी हरियाणातील पायलट आशिष तन्वर हे विमान चालवत होते. सुट्टी संपून ते ड्युटीवर नुकतेच रुजू झाले होते. त्यामुळे त्यांची हि सुट्टी त्यांच्या कुटुंबियांसोबतची शेवटची सुट्टी राहिली.

आरोग्यविषयक वृत्त –

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?