धक्कादायक ! बेपत्ता वकिलाच्या मृतदेहाचे आढळले तुकडे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बेपत्ता झालेल्या वकिलाच्या मृतदेहाचे तुकडे केलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अ‍ॅड. राजेश कांबळे असे बेपत्ता झालेल्या वकिलाचे नाव आहे. अ‍ॅड. कांबळे हे बेपत्ता असल्याची तक्रार सोलापूर आयुक्तालयात करण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असताना मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेलं पोत आढळून आले. हा प्रकार आज (बुधवार) दुपारी बाराच्या सुमारास पांडुरंग वस्तीमध्ये उघडकीस आला.

अ‍ॅड. राजेश कांबळे हे बेपत्ता असल्याची तक्रार बार असोसिएशनने सोलापूर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी कांबळे यांचा शोध सुरु केला. दरम्यान शहरातील पांडुरंग वस्तीतील एका घरातून मागील पाच दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली. पोलिसानी आज (बुधवार) पांडुरंग वस्ती येथील बंद घराचा दरवाजा उघडला असता आतमध्ये मृतदेहाचे तुकडे असलेले पोते पोलिसांना मिळाले. हा प्रकार समजताच पांडुरंग वस्तीमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी पांडुरंग वस्तीती बंद घरामध्ये आढळलेले मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. बंद घरामध्ये आढळलेला मृतदेह हा कांबळे यांचा असल्याची माहिती कुटुंबीय आणि पोलिसांनी दिली आहे. अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

Loading...
You might also like