‘त्या’ पोलिसांची पोलीस जीपमध्येच अोली पार्टी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चक्क गाडीमध्येच अोली पार्टी केल्याचा एक व्हिडीअो सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला असून, या व्हिडीअोमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार 30 मार्च रोजी घडला असून देहू रोड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलीस दलातील हे कर्मचारी असून मद्यधुंद अवस्थेत गाडीतच मद्यपान बंगळूर- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सरकारी वाहन चालवत होते. यावेळी या मार्गावरुन प्रवास करणारे योगेश मालखरे यांनी यासंदर्भात त्यांना जाब विचारत या प्रकरणाचा व्हिडीअो शेअर केला आहे.

मालखरे या मार्गावरुन प्रवस करत असताना त्यांच्या गाडीच्या मागे एक पोलीस गाडी कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत येत होती. मालखरे यांना वाटले हे आपली चाैकशी करतील मात्र असा कोणताही प्रकार न घडता हे पोलीस कर्मचारी आपल्याच नशेच्या धुंदीत असल्याचे दिसले. मालखरे यांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता मद्यपानाचे साहित्य दिसले. यावेळी पोलीस कर्मचारी इतके नशेत होते की, मालखरे त्यांच्याशी काय बोलत होते हे देखील समजले नाही. तो पोलीस कर्मचारी मालखरे यांना,”मी तुमच्या पाया पडतो. आता दारु घेतली आहे यापुढे घेणार नाही, नाहीतर मला उद्या फाशी घ्यावी लागेल व तुम्ही उद्या लाईव्ह करा मी फाशी घेतो,”असे त्या व्हिडीअोमध्ये दिसत आहे. मालखरे मद्यधुंद असलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही वाहन चालवू नका अशी विनंती करत असताना देखील तो पोलीस कर्मचारी गाडी पुढे रेटत आहे.

मालखरे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून अनेक अनाथ लोकांसाठी ते काम करतात. यापूर्वी अनेक वेळा मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकांकडून पोलीस नागरिकांकडून दंड वसूल करत गुन्हा दाखल करतात. मात्र आज हे कायद्याचे रक्षकच मद्यधुंद अवस्थेत असतील तर नागरिकांनाच कसा कायद्याचा धाक कसा राहणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

एवढेच नाही तर मद्यधुंद असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मालखरे यांनी पोलीसनामाशी बोलताना दिली आहे.