Loksabha : मतदान जनजागृतीसाठी लढवली ‘ही’ अजब शक्कल

हावडा : वृत्तसंस्था – सध्या देशभरात निवडणुकीचा ‘इलेक्शन फीव्हर’ जोर धरू लागला आहे. नागरिकांमध्ये मतदान जागृती व्हावी यासाठी पश्चिम बंगालच्या हावडा शहरातील एका हलवायाने अजब शक्कल लढवली आहे. यामुळे हलवायाचा आर्थिक लाभ होत आहेच शिवाय मतदानाची जनजागृती देखील होत आहे.

प्रदीप हलदर यांनी ही शक्कल लढवली असून त्यांचे हावडा येथे मिठाईचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्हे त्यांनी साकारली आहेत. लोकांना योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचा दावा हलदर यांनी केला आहे. हावडाच्या नागरिकांनाही ही शक्कल आवडली असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २३ मेला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल आणि भाजप यांच्यात लोकसभेचे जबर घमासान रंगणार आहे.

Loading...
You might also like