इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील Vs दत्‍तात्रय भरणेंचा ‘सामना’ रंगणार, बाजी कोण मारणार यावर लागली ‘बाजी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये उस्मानाबाद आणि सांगलीमध्ये कोणता उमेदवार विजयी होणार यावर पैज लागली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील कोणता उमेदवार जिंकणार आणि कोण पराभूत होणार याच्यावर पैजा लागल्या आहेत्या. इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे याच्या कार्यकर्त्यांमध्ये भन्नाट पैज लावण्यात आली आहे. या पैजेनुसार हर्षवर्धन पाटील विजयी झाल्यास सोमनाथ बनसोडे हे पराभूत उमेदवार जितक्या मतांनी पडला तितकी रक्कम स्वखुशीने नितीन साबळे यांना निकाल लागल्यानंतर 20 दिवसाच्या आत त्यांच्या घरी नेऊन देतील. तसेच जर दत्ता भरणे विजयी झाले तर हर्षवर्धन पाटील जितक्या मतांनी पराभूत होतील तितकी रोख रक्कम सोमनाथ बनसोडे यांना नितीन साबळे देतील.

या दोन कार्यकर्त्यांमध्ये लागलेली पैज लेखी स्वरुपात आहे. या लेखी पत्रकावर स्टॅम्प लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आनंदनगर गावचे उपसरपंच रोहित मोहोळकर यांनी या पैजेच्या रकमेची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार निकालानंतर 20 दिवसात पैजेची रक्कम विजयी उमेदवाराच्या समर्थकाला देण्यात येणार आहे. तसेच या पैजेसाठी 5 साक्षीदारांनी सह्या केल्या आहेत.

दत्ता भरणे यांचे पारडे जड
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मदत करून देखील विधानसभेसाठी इंदापूरची जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली असून मागील निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव दत्ता भरणे यांनी केला होता. दत्ता भरणे यांचा दांडगा जनसंपर्क असून सध्यातरी त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचा दिर्घ अनुभव यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये तुल्यबळ लढत होईल मात्र, यामध्ये कोण बाजी मारणार हे 24 ऑक्टोबरलाच समजेल.

Visit : policenama.com