बंडखोर अजित पवारांवर राष्ट्रवादीकडून ‘ही’ मोठी कारवाई, अधिकार काढून दिले ‘या’ बड्या नेत्याला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीने प्रसिद्धी पत्रक जारी करुन अजित पवारांना असलेल्या व्हिपचा आधिकार काढून घेतला आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार राहिला नाही. अजित पवार यांची ही निवड 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. परंतू भाजपबरोबर गेल्याने त्यांचे हे अधिकार काढून घेण्यात आला आहेत.

अजित पवार यांच्याकडून व्हिप काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आल्यानंतर आता ही जबाबदारी आणि अधिकारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आता यापुढे पक्षाचे जे काही आदेश असतील ते जयंत पाटलांकडून देण्यात येतील. त्यामुळे विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी जयंत पाटलांकडे राष्ट्रवादीने सोपावली आहे. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे निर्णय घेतल्यानंतर आता अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार शरद पवार आणि जयंत पाटलांकडे असेल.

त्यामुळे अजित पवार यांचे व्हिप काढण्याचे आणि पक्षनेता म्हणून असलेले सर्व अधिकार रद्द करण्यात आले आहेत. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाकडून अजित पवारांवर कारवाई करत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज पार पडलेले राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाकडून हा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com