Parvati Assembly Election 2024 | ’15 वर्षे एकहाती सत्ता, पर्वती मतदारसंघात एकतरी काम दाखवा’, अमोल कोल्हेंचा विरोधकांवर निशाणा

Amol Kolhe

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Parvati Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया फ्रंटच्या (India Aghadi) उमेदवार अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्या प्रचारार्थ परिसरात बाइक रॅली पार पडली. ही रॅली व्हीआयटी हॉस्टेल चौकापासून सुरुवात होऊन राम मंदिर चौक जनता वसाहत येथे तिचा समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मार्गदर्शन केले. (Parvati Assembly Election 2024)

अमोल कोल्हे म्हणाले, ” महाविकास आघाडी जाहीरनाम्यातील सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आरोग्य विमा, लाडकी बहीण योजना यामध्ये मोठी वाढ घडविण्यासाठी बदल घडवा. गेली १५ वर्षे विद्यमान आमदारांची एकहाती सत्ता असतानासुद्धा एकतरी काम पर्वती मतदारसंघात दाखवा. महिला आमदार असूनही १५ वर्षांत एकाही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही”, असे घणाघाती आरोप अमोल कोल्हे यांनी करत पर्वतीत बदल घडविण्याचे नागरिकांना आवाहन केले.

अश्विनी कदम म्हणाल्या,” या प्रचाराच्या रणधुमाळीत पर्वतीकरांनी प्रचंड प्रेम आणि पाठिंबा दाखवला.
एवढा जनसमुदाय पाठीशी असल्यावर पर्वतीत बदल नक्कीच घडणार याची आज पुन्हा खात्री झाली.
माझे कार्यकर्ते आणि माझे पर्वतीकर नागरिक हेच माझा अभिमान आहेत.
त्यांचा भक्कम पाठिंबा मला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल”,
असा विश्वास अश्विनी कदम यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Ajit Pawar On Trumpet Symbol | “पिपाणीमुळं आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली”, अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले – ‘विरोधकांनी बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली’

Maval Assembly Election 2024 | मावळात सुनील शेळके-बापू भेगडेंचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत धक्काबुक्की

Kothrud Assembly Election 2024 | पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली- चंद्रकांतदादा पाटील

Bhor Assembly Election 2024 | महायुतीने उमेदवार शंकर मांडेकर यांचा घणाघात; म्हणाले –
‘गुंजवणी धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न 25 वर्षे का रेंगाळला? पुनवर्सित वसाहती दुर्लक्षित, सुविधा देण्यात आमदार अपयशी’

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)