Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात जयंत पाटील यांच्या जाहीर सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित; म्हणाले – ‘अश्विनी कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करा’

Parvati Assembly Election 2024 | A large crowd attended Jayant Patil's public meeting in Parvati Constituency; Said - 'Make Ashwini Kadam win with huge majority'

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Parvati Assembly Election 2024 | सध्या राज्यात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी सगळ्याच पक्षांची प्रचारसभेसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्या प्रचारार्थ (दि.१०) शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची जाहीर सभा हिंगणे चौक याठिकाणी पार पडली.

यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. या जाहीर सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मागील १५ वर्षात मतदारसंघात विकास झालेला नाही. अनेक प्रलंबित कामे आहेत. ती मार्गी लावण्यासाठी अश्विनी कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले.

अश्विनी कदम म्हणाल्या, ” मतदारसंघातील नागरी प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी झाल्या असून ही निष्क्रियता आपल्या सर्वांना संपवायची आहे. पुणे मनपा स्थायी समिती पदी अध्यक्ष म्हणून काम पाहताना पुणे शहरात अनेक लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावत स्मार्ट आणि सुंदर पुणे घडवले आहे.

आत्ता पर्वतीकरांची लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने आणि साक्षीने महाराष्ट्राला हेवा वाटेल असा मतदारसंघ घडविण्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहणार आहे “, असे अश्विनी कदम यांनी म्हंटले आहे.

Total
0
Shares
Related Posts