Parvati Assembly Election 2024 | निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच आबा बागुल आजारी, पर्वती मतदारसंघात प्रचाराची मोहीम मतदारांनीच घेतली हाती

Parvati Assembly Election 2024 | In the midst of the election campaign, Aba Bagul is ill, the voters have taken up the campaign in Parbati Constituency.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Parvati Assembly Election 2024 | शहरातील चर्चेत असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. महायुतीकडून माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच आबा बागुल आजारी पडल्याने मागील काही दिवसांपासून त्यांचे कार्यकर्ते, मतदारच प्रचारासाठी पुढे सरसावले आहेत. दरम्यान ‘हिरा’ या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या आबा बागुल यांच्या प्रचाराची मोहीम मतदारांनीच हातात घेतल्याचे चित्र आहे.

आबा बागूल यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघ बागूल कुटुंबीय व मित्र परिवार पिंजून काढत आहेत. मतदारांची थेट भेट, पदयात्रा, कोपरा सभा या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधत आहेत. दरम्यान याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बागूल आजारी असल्याने त्यांच्या पत्नी जयश्री बागूल यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे.

प्रचारप्रमुख हेमंत बागूल, अमित बागूल, कपिल बागूल, अभिषेक बागूल, सागर बागूल यांनी प्रचाराची व्यूहरचना आखली आहे. पदयात्रांची आखणी, कोपरा सभांच्या वेळापत्रकानुसार प्रचारावर भर दिल्याने संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त आणि आश्वासक प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कोपरा सभांमध्ये जयकुमार ठोंबरे, नीता नेटके, बेबी राऊत, सुनीता नेमुर, राजिया बिलारी यांच्यासह महाराणा प्रताप मंडळ, अखिल अप्पर मित्र मंडळ, दुर्गामाता नवरात्र उत्सव, पंचशील मित्रमंडळ, निळं वादळ ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Total
0
Shares
Related Posts