Parvati Assembly Election 2024 | अश्विनी कदम यांच्या उपस्थितीत पर्वती विधानसभा मविआ प्रभागनिहाय आढावा बैठक; ” मतदारसंघातील समस्यांना अनुसरून ही निवडणूक लढली जावी” पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर

Parvati Assembly Election 2024 | In the presence of Ashwini Kadam, Parvati Assembly Maviya ward-wise review meeting; "This election should be fought according to the problems in the constituency" is the tone of office bearers and activists

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Parvati Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजलं आहे. दरम्यान सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रचारासाठी अवघे १४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे मतदारसंघातील उमेदवारांनी सभा, बैठकांना जोर दिलेला आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या (BJP) माधुरी मिसाळ (Madhuri Misal) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून प्रचाराला वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.४) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या उपस्थितीत पर्वती विधानसभा महाविकास आघाडी प्रभागनिहाय आढावा बैठक महर्षी नगर, अनुसया हॉल येथे पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक २८ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाहतूक कोंडी, सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, पावसाचं साचणारं पाणी या मतदारसंघातल्या मुख्य समस्या आहेत. या समस्यांना अनुसरून ही निवडणूक लढली जावी आणि आपले प्रश्न सुटावे अशी नागरिकांची मागणी असल्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माधुरी मिसाळ या भाजपकडून सलग तीन टर्म मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान असणार आहे.

Total
0
Shares
Related Posts