पुणे : Parvati Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने (Koyta Attack) सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले (Attempt To Murder). परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police) एका गुन्हेगार अल्पवयीन मुलास ७ ते ८ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सुरज ऊर्फ बाल्या नितीन क्षीरसागर (वय २१, रा. शाहु वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आदित्य गेजगे, पल्या पासंगे (दोघे ही रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांच्यासह त्याच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पल्या पासंगे याच्यावर फरासखाना (Faraskhana Police Station) व स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर मोक्का अंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजता शाहु वसाहतीतील म्हसोबा मंदिराजवळ रोडवर उभे असताना पल्या, आदित्य, शुभम व त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सुरज याच्यावीर कोयत्याने डोक्यात, दोन्ही हातावर, गुडघ्यावर सपासप वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी येणार्या परिसरातील लोकांना या टोळक्याने धमकावुन कोण मध्ये आला तर त्याला देखील याच्या सारखेच तोडु, असे बोलून शिवीगाळ करीत दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.