… म्हणून ते मोठे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्या दारात जात नाही. स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता असणारेच रात्री – अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे मत भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मी टोपी फेकली आहे ती कोणाच्याही डोक्यावर बसू शकेल त्यातूनच आमदार विश्वजित कदम यांना भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचा खुलासा करावा लागला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळेस घेण्यास आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच त्यांनी काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता. चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा देताना पुढील ८ ते १० दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणार असल्याचे नमूद केले होते.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचे कौतुक

कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले आहे. हसन मुश्रीफ हे सहृदयी आणि अनुभवी माणूस आहेत. त्यांच्यासारखे आमदार भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दहा ते बारा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत पण कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराचा त्यात समावेश नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like