कोल्हापूरातही राष्ट्रवादीला ‘धक्‍का’ ! माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रावादीला मोठा झटका बसला. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला चांगलेच झटके मिळत आहेत. मागील आठवड्याभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आमदारांनी राष्ट्रवादीला राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर आहेत. तसंच मुंबईतही अनेक नगरसेवकांनी भाजप प्रवेशाचे निश्चित केले आहे. आता २०१४ च्या मोदी लाट असूनही त्यात निवडून आलेले राष्ट्रावादीचे माजी खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यात ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

मागील आठवड्यात राष्ट्रवादीला अनेकांनी रामराम ठोकला आहेत. मात्र आता धनंजय महाडिकांचा रामराम राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागू शकतो. कारण धनंजय महाडिक यांच्यासह आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदिंकडूनही भाजपा प्रवेशाची चाचपणी सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. तसं पाहिले तर काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीलाच राज्यात मोठे खिंडार पडले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेते, आमदारांनी राजीनामे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे राष्ट्रवादीची झालेली अवस्था कमकुवत झाली आहे. त्यात नेत्यांचे राजीनामा सत्र राष्ट्रवादीची अवस्था अधिक कमकुवत होण्याची शक्यता आहे. नेत्यांच्या पक्षांतराने मात्र कार्यकर्ते संभ्रमात पडत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त